वाशीम : कारची ट्रकला धडक; २ जण जागीच ठार | पुढारी

वाशीम : कारची ट्रकला धडक; २ जण जागीच ठार

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : नागपूर – औरंगाबाद महामार्गावरील उमरदरी जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिली. ही घटना आज (दि.१६) दुपारी ३.४५ च्या दरम्यान घडली. या अपघातात २ जण जागीच ठार झाले. तर दोन जण किरकोळ जखमी झाले. जखमींना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.

सुभाष हिंगे (वय ३४) व संपत शिंदे (वय ३३, दोघेही रा. रेटवाडी, जि. पुणे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
मालेगाव तालुक्यातील जऊळका पोलीस स्टेशन हद्दीतील औरंगाबाद नागपूर हायवेवर उमरदरी जवळ रोडवर उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिली. पुढील तपास जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार मोरे करत आहेत.

Back to top button