जालना : वडीगोद्री, शहागड, गोंदी परिसरात वादळी पाऊस; कपाशी,ऊस,बाजरी भुईसपाट; पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली | पुढारी

जालना : वडीगोद्री, शहागड, गोंदी परिसरात वादळी पाऊस; कपाशी,ऊस,बाजरी भुईसपाट; पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा वडीगोद्री, शहागड, गोंदी परिसरात काल (शनिवार) सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील कपाशी, ऊस, बाजरी, कडूळ हि पिके भूईसपाट झाली. तर फळबागांची फळगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पावसाची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना वादळी वाऱ्याने मोठा फटका दिला. मोठी व दोडे आलेली कपाशी पूर्ण खाली झोपली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

महिना भरापासून पावसाचा खंड पडल्‍याने बळीराजा पाऊस कधी येतो याची वाट पाहत बसला होता. मात्र पावसाबरोबर वादळी वारे आल्याने सर्व पिके वाऱ्याच्या वेगाने झोपली. अनेक ठिकाणचे पत्रे उडून गेले, हॉटेलचे शेड पडले. शेतातील परिसरातील मोठं मोठी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी विद्युत पोलही पडले आहेत. पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

हेही वाचा :  

Back to top button