जालना : तीन जणांचा जुन्या वादातून एकावर चाकूहल्ला | पुढारी

जालना : तीन जणांचा जुन्या वादातून एकावर चाकूहल्ला

जालना, पुढारी वृत्तसेवा ः दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी जुन्या वादातून एकावर चाकूहल्ला केला आहे. ही घटना शहरातील गरीब शहा बाजार परिसरात घडली. जखमीच्या पोटात तसाच राहिलेला चाकू रुग्णालयात शस्त्रक्रिया करून काढण्यात आला.

शेख नफीस शेख हबीब (वय 27 रा. कन्हैयानगर) अस जखमी युवकांचे नाव आहे. शेख नफीस शेख हबीब यांचे निशांत उमेश नंद्रेकर व आशु अशोक शिंदे यांच्यासोबत जुना वाद आहे. या वादातून निशांत व आशुने हा चाकूहल्ला केला आहे. याप्रकरणी तीन जणांना पोलीसानी ताब्यात घेतले आहे.

Back to top button