जालना : भरधाव ट्रकच्या धडकेत एकजण जागीच ठार | पुढारी

जालना : भरधाव ट्रकच्या धडकेत एकजण जागीच ठार

जालना, पुढारी वृत्तसेवा : भरधाव ट्रकने धडक दिल्याने रस्त्याने पायी जाणाऱ्या युवकाचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. जालना-देऊळगावराजा मार्गावरील जामवाडी तलावाजवळ शनिवारी (दि.२७) सायंकाळी ही दुर्घटना घडली. दिनेश दामोधर पवार (वय ३५,रा.श्रीकृष्णनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

ट्रॅक्टर चालक म्हणून काम करणारा दिनेश पवार हा तरुण आज जामवाडी गावालगत असलेल्या तलाजवळील मुख्य रस्त्यावरून पायी चालत असताना जालन्याहून देऊळगावराजाकडे जाणाऱ्या ट्रकने दिनेश पवार यास धडक दिली. त्यामुळे टायरच्या चाकाखाली आल्याने त्याचा चिरडून जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळी न थांबता ट्रक घेऊन पळून गेला.

दरम्यान, स्थानिक युवकांनी ट्रकचा पाठलाग करून ट्रकला आनंद गड घाटात पकडले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या प्रकरणी तालुका ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मृत दिनेश याच्या पश्चात आईवडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button