जीप चोरणारे दोन आरोपी जालन्यात जेरबंद | पुढारी

जीप चोरणारे दोन आरोपी जालन्यात जेरबंद

जालना, पुढारी वृत्तसेवा ः भोकरदन तालुक्यातील पारध येथील अमीत मदनलाल बेराड यांची बोलेरो जीप जालना शहरातुन चोरीस गेली होती. या प्रकरणी पेलिसांनी दोन चोरट्यांना जेरबंद केले असुन त्यांच्या ताब्यातुन चोरीस गेलेली जीप जप्त केली आहे.

भोकरदन तालुक्यातील पारध येथील अमीत मदनलाल बेराड यांची बोलेरो जीप (क्र एमएच-21-व्ही 5581)ही जालना शहरातुन घरासमोरुन अज्ञात चोरट्यानीं चोरुन नेली होती. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचन यांना जिप जिंतुर रोडने परभणीकडे नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली.

Back to top button