हिंगोली : ६ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू | पुढारी

हिंगोली : ६ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू

औंढा नागनाथ: पुढारी वृत्तसेवा: औंढा नागनाथ तालुक्यातील मुदत संपलेल्या सहा ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया आजपासून (दि.२४) सुरू करण्यात आली आहे. तहसील कार्यालयात दोन टेबल वरून उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जात आहेत. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला नाही.

तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सचिन जोशी, अव्वल कारकून शैलेश वाईकर, निवडणूक निर्णय अधिकारी जी. के. पाटील, गंगाधर गिनगिने, सहायक निवडणूक अधिकारी हनीफ खान पठाण, आर. एस. सवनेकर काम पाहत आहेत. १ सप्टेंबर पर्यंत नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. २ सप्टेंबरला नामनिर्देशन अर्जाची छाननी होणार असून ६ सप्टेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याच दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्धी करून चिन्ह वाटप होणार आहेत. ग्रामपंचातींसाठी १८ सप्टेंबरला मतदान तर १९ सप्टेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button