पैठण : नाथसागर धरणाचे १८ दरवाजे पुन्हा दोन फुटांनी उचलणार | पुढारी

पैठण : नाथसागर धरणाचे १८ दरवाजे पुन्हा दोन फुटांनी उचलणार

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये पाण्याच्या आवकचे प्रमाण दररोज कमी जास्त होत आहे. त्यामुळे या धरणाच्या २७ दरवाजांपैकी १८ दरवाजे पुन्हा दोन फूटांनी उचलणार असल्याची माहिती धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी दैनिक पुढारी शी बोलताना दिली आहे.

नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दररोज पाऊस पडत असल्याने येथील धरणामध्ये दररोज कमी अधिक मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा जमा होत आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व पाणी वाटप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या पाण्याची टक्केवारी पेक्षा अधिक प्रमाणावर पाण्याची टक्केवारी आहे. त्यामुळे दिवसभरात कमी जास्त प्रमाणावर पाण्याची आवक होत असल्याने धरण नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दरवाजे दोन फुट उचलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली.

हेही वाचा

Back to top button