अकोला : धारधार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या; मारेकरी फरार | पुढारी

अकोला : धारधार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या; मारेकरी फरार

अकोला: पुढारी वृत्तसेवा : सिविल लाइन पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या न्यू तापडिया नगरात शनिवारी रात्री ३५ वर्षीय तरुणाची गणपती मंदिरासमोर हत्या झाल्याची घटना घडली. मृत युवक हा पंचशील नगरातील रहिवाशी आहे.

मृतकाचे नाव विनोद वामनराव टोबरे नाव आहे.

विजय हा सामजिक कार्यकर्ता होता. परिसरातील लोकांच्या अडी अडचणीला धावून जाणारा तरुण होता. याआधी दोन राजकीय पक्षात कार्यरत होता. ही हत्या राजकीय वर्चस्वातून झाली की, आणखी कोणते दुसरे कारण आहे, याबाबात अद्याप माहिती समोर आली नाही. हत्याकांड झाल्याचे कळताच घटनास्थळी श्वान पथक आणि गून्हे अन्वेषण विभाग पथक पोहचले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आला.

मारेकऱ्यानी तरुणावर धारधार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जख्मी केले. त्याच्या डोक्यावर दगड विटाने वार करून अक्षरशः ठेचून हत्या करण्यात आली आहे. एकाच वेळी चार ते पाच मारेकऱ्यांनी विजयवर वार केला असावा,असा कयास पोलिसांनी लावला आहे. मारेकऱ्यांच्या शोध घेण्यास पोलिस विभागाने तपास चक्रे फिरविली आहेत.

Back to top button