हिंगोली : काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी दिलीपराव देसाई यांची निवड | पुढारी

हिंगोली : काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी दिलीपराव देसाई यांची निवड

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा: हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी दिलीपराव देसाई यांची निवड करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून प्रदेश संघटन सरचिटणीस देवानंद पवार यांनी देसाई यांची निवड जाहीर केली. या निवडीमुळे पक्षांच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

दिवंगत खासदार राजीव सातव यांचे समर्थक दिलीपराव देसाई यांची प्रदेश स्तरावरून आज प्रभारी जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या निवडीचे वृत्त कळताच जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष ताकदीने लढवून जिंकणार असल्याचा मनोदय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल काँग्रेस पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

सर्वांना सोबत घेऊन संघटन मजबूत करणार

पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी ही अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका आ. प्रज्ञा सातव यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकू. जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व आजी माजी लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन पक्षाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार दिलीपराव देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

Back to top button