…तर आमचाच कार्यक्रम संपला असता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

...तर आमचाच कार्यक्रम संपला असता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सत्ता परिवर्तन झाले; परंतु ही लढाई काही अगदीच सोपी नव्हती. थोडं जरी उण्णीस-बीस झाले असतं, तर आमचाच कार्यक्रम संपला असता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादेतील राज्यस्तरीय व्यापारी परिषदेत केला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती.

राज्यातील सत्ता परिवर्तनाबद्दल मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात चांगलं वातावरण आहे. लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झाले आहे, असा विश्वास लोकांना आहे. म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांची जी भूमिका होती, ते जे सरकार त्यांनी स्थापन केलं होते. त्यांचेच विचार आम्ही पुढे नेतोय. यासाठी आम्ही जी काही लढाई केली, ती सोपी नव्हती. आपण टीव्हीवर बघत होता. थोडा उण्णीस-बीस झाला असता तर आमचा कार्यक्रम संपला असता; पण या राज्यातल्या जनतेचा आर्शिवाद, विश्वास सोबत होता. त्यामुळे युतीचे सरकार स्थापन होऊ शकले, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button