हिंगोली : औंढा नागनाथ तलाव ओव्हरफ्लो | पुढारी

हिंगोली : औंढा नागनाथ तलाव ओव्हरफ्लो

औंढा नागनाथ; पुढारी वृत्‍तसेवा : हिंगोली जिल्हात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ओढे, नाले, नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ शहराचा पाणीपुरवठा या तलावावर अवलंबून आहे. या शिवाय वगरवाडी, वगरवाडी तांडा या भागातील शेती देखील याच तलावाच्या सिंचनाखाली येते. औंढा नागनाथ तालुक्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे औंढा नागनाथ तलाव ओव्हरफ्लो झाला असून, हा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटक या तलावाच्या पाण्यात मनमुराद भिजण्यासाठी गर्दी करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button