बीड : गेवराईत धावत्या कारने घेतला अचानक पेट | पुढारी

बीड : गेवराईत धावत्या कारने घेतला अचानक पेट

गेवराई : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या एका कारने अचानक पेट घेतल्याची घटना आज ( दि.१९) दुपारी दोनच्या सुमारास गेवराई न्यायालयासमोर घडली. या दुर्घटनेत कोणत्याही जीवितहानी झालेली नाही. कारला लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार दुपारी दोनच्या सुमारास काही जण कार मधून राष्ट्रीय महामार्गावरून जात होते. यावेळी ही कार गेवराईतील न्यायालयाजवळ येताच अचानक कारने पेट घेतला. अचानक पेट घेतलेली गाडी पाहून नागरिकांनी गाडीकडे धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग विझविण्यात नागरिकांना यश आले नाही. शेवटी अग्निशमक दलाच्या बंबाने कारला लागलेली आग विझवली. हा घटना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कारच्या चालकाने वेळीच सावधगिरी बाळगल्याने कोणत्याही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचलंत का ? 

Back to top button