Monsoon 2025: यंदा महाराष्ट्रात मान्सून का लवकर आला?

Why Monsoon early in this year: अवघ्या 24 तासांत त्यांने 30 टक्यांपेक्षा जास्त राज्याचा भाग व्यापाला असून आगामी दोन ते तीन दिवसांत अवघे राज्य व्यापेल
image of mumbai rains marin drive
मान्सून का लवकर आला? पुढारी
Published on
Updated on
  • मान्सूनचे मुंबई,पुण्यात विक्रमी वेळेत आगमन

  • 75 वर्षांनी इतक्या लवकर आला

  • मुंबईत 29 मे 1956,1962,1971 रोजी आला होता

  • 24 तासांत 30 टक्के राज्य व्यापले

पुणे: मान्सूनने रविवारी सकाळी तळकोकणात प्रवेश केला होता अवघ्या बारा तासांत त्याने सोमवारी सकाळी मुंबईसह पुणे आणि सोलापूर पर्यंत धडक मारली.अवघ्या 24 तासांत त्यांने 30 टक्यांपेक्षा जास्त राज्याचा भाग व्यापाला असून आगामी दोन ते तीन दिवसांत अवघे राज्य व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

पुणे शहरात 12 जून तर पुण्यात 10 जून रोजी मान्सून दाखल होतो.काही वेळा तो मुंबईत आधी नंतर पुण्यात आला आहे.यंदाही तो मुंबईत विक्रमी वेळेत 26 मे रोजी दाखल झाला.या पूर्वी मुंबईत तो 29 मे 1956,1962 आणि 1971 रोजी आल्याचे दाखले आहेत.त्यामुळे सुमारे 52 ते 75 वर्षांनी तो लवकर आला आहे.आगामी दोन दिवसांत तो अवघे राज्य व्यापेल असा अंदाज आहे.

राज्यातील दहा दिवसांतला विक्रमी पाऊस..

  • महाराष्ट्र राज्य एकुणः 437 टक्के जास्त

( मे महिन्याची सरासरी ः 20.7,प्रत्यक्ष पडलाः 111.1 मी.मी)

  • विभागवार पाऊस (कोकण, मुंबईसह)

400 टक्के पेक्षा जास्त

(मे ची सरासरी ः 14.4 ,प्रत्यक्ष पडला ः 246.9 मी.मी )

  • मध्यमहाराष्ट्रः 369 टक्के जास्त

( मे ची सरासरी ः 20 मी,मी.,पडलाः 93.7 मी.मी)

  • मराठवाडा : 290 टक्के जास्त

( सरासरी : 20.8 मी.मी,पडलाः 81.1.मी.मी)

  • विदर्भः 387 टक्के जास्त

अवकाळीची अतिवृष्टी अन मान्सून लवकर येण्याची कारणे..

  • कमी दाबाचे पट्टे अनुकूल झाल्याने मान्सून प्रचंड वेगाने आला.

  • अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले त्याच्या प्रभावाने मान्सून अंदमान ते केरळ आणि पुढे महाराष्ट्रात विक्रमी वेगाने आला

  • समुद्रावर सध्या 1010 हेक्टा पास्कल इतके हवेचे दाब आहेत. तर देशात ते दाब 1000 हेक्टा पास्कल आहेत.

  • हवा ही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते.त्यामुळे देशात अन राज्यात मान्सूनचा वेग खूप जास्त आहे.

  • हवेचे दाब 13 मे पासून 28 मे पर्यंत अनुकूल आहेत.ते दाब न वाढल्याने पावसाच खंड पडला नाही.

  • अवकाळी सलग दहा दिवस बरसला अन त्यातच मान्सूनचे आगमन झाले.त्यामुळे शेतकर्यांना अवकाळी आणि मान्सून यातला फरक करणे यंदा अवघड झाले.

  • राज्यात गत दहा दिवसात सर्वंच जिल्ह्यात 300 ते 400 टक्के इतका पाऊस झाला.

शंभर वर्षातला दुर्मिळ मे महिना..

आयएमडी,पुणे चे निवृत्त अतिरिक्त महासंचालक डॉ.कृष्णानंद होसाळीकर म्हणाले,यंदाचा मान्सून शतकातील सर्वात वेगळा असून गत शंभर वर्षात असा पाऊसच नाही. यंदा सर्वच ठिकाणी मान्सून 10 ते 17 दिवसांपेक्षा लवकर आला आहे. अंदमान निकोबार मध्ये तो नियोजित तारखेच्या दहा दिवस आधी आला आहे त्या ठिकाणी येण्याची तारीख 18 ते 20 मे ही असते परंतु यंदा तो 13 मे रोजी अंदमान दाखल झाला तेथून केरळ पर्यंत येण्याचा प्रवास साधारण 25 दिवसांचा असतो मात्र तो अवघ्या 13 दिवसात केरळमध्ये आला.तर केरळ ते तळकोकण हाही प्रवास दहा ते पंधरा दिवसांचा गृहीत धरला जातो मात्र यंदा तो अवघ्या काही तासात तो गोव्यात आणि तिथून तळकोकणात बारा तासात आला.

मुंबईत मानसून येण्याची तारीख ही 12 जून आहे मात्र यंदा तो तब्बल 17 दिवस आधी मे 26 मे रोजी दाखल झाला आहे. जुने जाणकार सांगतात की असा पाऊस त्यांनी पन्नास ते साठ वर्षात पाहिले नाही हे खरे आहे. या शतकात मान्सून खूप कमी वेळा मे महिन्यात दाखल झाला आहे. मुंबईत यापूर्वी 29 मे 1956 रोजी आला होता त्यानंतर प्रथमच 26 मे रोजी तो मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळे या मान्सून ने आजवरचे सर्व विक्रम मोडले असे म्हणता येईल.असेही होसाळीकर यांनी सांगितले.

कृष्णानंद होसाळीकर,निवृत्त अतिरिक्त महासंचालक,आयएमडी,पुणे

मान्सून आगमनाचा तक्ता..

ठिकाण - नियोजित दि.-. यंदा आला - किती लवकर आला

अंदमान ---- 20 मे ---13 मे - 13 दिवस

केरळ ------1 ते 5 जून --- 24 मे - 12 ते 16 दिवस

तळकोकण ---- 6 ते 8 जून ---- 25 मे-- 12 दिवस

मुंबई-------- 12 जून --- 26 मे -- 17 दिवस

पुणे ------- 13 ते 15 जून --26 मे -- 18 ते 20 दिवस

देशाची स्थितीः सरासरी 22 टक्के जास्त

(सरासरी ः 14.6 मी.मी.पडला ः 115.5 मी.मी)

राज्य(विभाग) --- पावसाची टक्केवारी

लद्दाख ------- 387 टक्के जास्त

जम्मू कश्मिर----- (उणे 38 टक्के)

हिमाचल प्र.------(उणे 25 टक्के)

पंजाब -------- (उणे 9 टक्के)

हरियाना ------- 88 टक्के जास्त

उत्तरराखंड------- 26 टक्के जास्त

राजस्थान-------- 80 टक्के जास्त

दिल्ली---------- 105 टक्के जास्त

उत्तर प्र.--------- 20 टक्के जास्त

गुजरात --------- 1544 टक्के जास्त

गोवा,दमण,दिव---- 3972 टक्के जास्त

महाराष्ट्र---------- 437 टक्के जास्त

तेलंगण --------- 1329 टक्के जास्त

कर्नाटक --------- 141 टक्के जास्त

केरळ ---------- 150 टक्के जास्त

तामिळनाडू------- 91 टक्के जास्त

पुद्दुचेरी---------- 97 टक्के जास्त

आंध्रप्रदेश--------- 85 टक्के जास्त

ओडिशा---------- 59 टक्के जास्त

छत्तीसगड ---------132 टक्के जास्त

बिहार ----------- 57 टक्के जास्त

पं.बागाल---------- 40 टक्के जास्त

सिक्कीम----------- 05 टक्के जास्त

मेघालय----------- 12 टक्के जास्त

अरुणाचल प्र.------- (उणे 48 टक्के)

आसाम ----------- 16 टक्के जास्त

नागालॅन्ड ---------- (उणे 25 टक्के)

मणिपूर ----------- (उणे 40 टक्के)

मिझोराम ---------- (उणे 55 टक्के)

त्रिपूरा-------------( उणे 42 टक्के)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news