महाराष्ट्राला एकूण १४ पद्म पुरस्कार : पाहा संपूर्ण पद्म पुरस्‍कारांची यादी

Padma Award | मनोहर जोशी, पंकज उदास, शेखर कपूर यांना पद्मभूषण तर मारुती चितमपल्ली, अशोक सराफ यांना पद्मश्री
Padma Award |
मनोहर जोशी, पकंज उदास, शेखर कपूर, अशोक सराफ File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराच्या खालोखाल प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार मानले जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा झाली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश जगदीशसिंह खेहर यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला. बिहारमधील लोकगायिका शारदा सिन्हा, केरळमधील एमटी वासुदेव नायर यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. तेलंगणामधील प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डी. नागेश्वर रेड्डी यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, प्रख्यात पार्श्वगायक पंकज उदास यांना पद्मभूषण पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात आला. शेखर कपूर यांना कला क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातून पक्षी अभ्यासक अरण्यऋषी मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ,अरुंधती भट्टाचार्य यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. पद्म पुरस्कारांमध्ये एकूण १४ पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाले.

कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक सेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकीय सेवा, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदा मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. यंदा १३९ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. ७ जणांना पद्मविभूषण, १९ जणांना पद्मभूषण आणि ११३ जणांना पद्मश्री सन्मान जाहीर झाले. एकूण पद्म पुरस्कारांमध्ये १३ मरणोत्तर, २३ महिला आणि १० परदेशी/ अप्रवासी पुरस्कारार्थी आहेत.

शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे आणि गायक अरिजित सिंह यांना पद्मश्री

प्रसिद्ध शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. त्यांनी जगभरातील अनेक संगीत संमेलनांमध्ये आणि मैफिलींमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. यामध्ये पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, भुवनेश्वर, ओरिसा येथील राजा राणी महोत्सव, पुण्यातील गान सरस्वती महोत्सव यांचा समावेश आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय कार्यक्रम आणि आकाशवाणीच्या संगीत संमेलनामध्ये सहभाग घेतला आहे. अनेक शिष्यांना गायकीचे शिक्षण देत आहेत तसेच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्या अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये शास्त्रीय संगीतावर व्याख्याने - प्रात्याक्षिके देतात. तसेच आपल्या आवाजाने भारतासह जगभरातील लोकांना भुरळ घालणारे गायक अरिजित सिंह यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. अरिजीत सिंह मोर्चे पश्चिम बंगालचे आहेत मात्र भारताचा जगभरात मोठ्या प्रमाणात त्यांची गाणी ऐकली जातात. वयाच्या ३७ व्या वर्षी अरिजीत सिंह यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. 

नागेश्वर रेड्डी यांना तीन पद्म पुरस्‍कार

तेलंगणामधील प्रख्यात पोटविकार तज्ज्ञ डी. नागेश्वर रेड्डी यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. यापूर्वी त्यांना २०१६ मध्ये पद्मभूषण आणि २००२ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. पद्म पुरस्कारांमधील पद्मविभूषण, पद्मभूषण, आणि पद्मश्री असे तिन्ही पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये त्यांचा समावेश झाला.

'सरकारचे दिल्लीसह उत्तरेत विशेष लक्ष'

बिहारमधील प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांना कला क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. त्यांची अनेक लोकगीते प्रसिद्ध आहेत. छटपूजेसंदर्भात जी गाणी ऐकली जातात त्यापैकी बहुतांश गाणी ही त्यांनी गायली आहेत. पूर्वांचल भागातील लोकांसाठी त्या आदरस्थानी आहेत आणि पूर्वांचल मधील लोकांवर त्यांचा चांगला प्रभाव आहे. दिल्लीत ४० लाखांपेक्षा जास्त पूर्वांचल भागातील नागरिक राहतात.

मूळचे बिहारचे असलेले डॉ. हेमंतकुमार यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी आणि दिवंगत किशोर कुणाल यांना नागरी सेवा क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले. डॉ. हेमंतकुमार वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असले तरी सर्व समाज घटकांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. मूळचे बिहारचे असलेले डॉ. हेमंत कुमार वैद्यकीय क्षेत्रातील कामासाठी देशभर प्रसिद्ध आहेत. किशोर कुणाल यांना नागरी सेवेसाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. आचार्य किशोर म्हणूनही ते ओळखले जायचे. किशोर कुणाल गुजरात केडरचे भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी राहिले आहेत.

महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते

पद्म भूषण

मनोहर जोशी (मरणोत्तर) ) - सार्वजनिक कार्य, महाराष्ट्र

पंकज उधास (मरणोत्तर) - - कला, महाराष्ट्र

शेखर कपूर - कला, महाराष्ट्र (दिग्दर्शक)

पद्मश्री

अच्युत रामचंद्र पालव - कला, महाराष्ट्र (सुलेखनकार)

अरुंधती भटाचार्य - व्यापार आणि उद्योग, महाराष्ट्र (उद्योजक)

अशोक लक्ष्मण सराफ - कला, महाराष्ट्र (अभिनेते)

अश्विनी भिडे देशपांडे - कला, महाराष्ट्र (प्रख्यात गायिका)

चैत्राम देवचंद पवार - सामाजिक कार्य, महाराष्ट्र (सामाजिक कार्यकर्ते)

जसबिंदर नारुला - कला, महाराष्ट्र (प्रसिद्ध गायिका)

अरण्यऋषी मारुती भुजंगराव चितांपल्ली - साहित्य आणि शिक्षण, महाराष्ट्र

रणेंद्र भानू मजुमदार - कला, महाराष्ट्र

शुभाश खेचुलाल शर्मा - कृषी, महाराष्ट्र (शेती तज्ज्ञ)

वासुदेव कामत - कला, महाराष्ट्र (नामांकित चित्रकार)

डॉ. विलास डांगरे - वैद्यकीय सेवा (महाराष्ट्र) प्रसिद्ध होमिओपॅथी उपचार तज्ज्ञ

पद्मविभूषण पुरस्कार

1. दुव्वुर नागेश्वर रेड्डी (तेलंगणा)- वैद्यकीय

2. न्यायमूर्ती (निवृत्त) जगदीश सिंह (चंदीगड)- सार्वजनिक व्यवहार

3. कुमुदिनी रजनीकांत लखिया (गुजरात)- कला

4. लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम (कर्नाटक)- कला

5. एम. टी. वासुदेवन नायर (मरणोत्तर) (केरळ)- साहित्य आणि शिक्षण

6. ओसामू सुझुकी (मरणोत्तर) (जपान)- व्यापार आणि उद्योग

7. शारदा सिन्हा (मरणोत्तर) (बिहार)- कला

पद्मभूषण पुरस्कार

1. मनोहर जोशी (मरणोत्तर ) (महाराष्ट्र)- सार्वजनिक व्यवहार

2. पंकज उधास (मरणोत्तर ) (महाराष्ट्र)- कला

3. शेखर कपूर (महाराष्ट्र)- कला

4. सूर्य प्रकाश (कर्नाटक)- साहित्य आणि पत्रकारिता

5. आनंत नाग (कर्नाटक )- कला

6. विवेक देबरॉय (मरणोत्तर) ( दिल्ली)- साहित्य आणि शिक्षण

7. जतीन गोस्वामी (आसाम)- कला

8. जोस चाको पेरीयापुरम (केरळ)- वैद्यकीय

9. कैलास नाथ दीक्षित (दिल्ली)- पुरातत्व

10. नल्ली कुपुस्वामी चेट्टी ( तामिळनाडू)- व्यापार आणि उद्योग

11. नंदामुरी बालकृष्ण (आंध प्रदेश )- कला

12. पी. आर. श्रीजेश ( केरळ)- खेळ

13. पंकज पटेल ( गुजरात )- व्यापार आणि उद्योग

14. राम बहादूर राय (उत्तर प्रदेश)- साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता

15. साध्वी ऋतंभरा (उत्तर प्रदेश)- समाजसेवा

16. एस. अजीथ कुमार (तामिळनाडू)- कला

17. शोभना चंद्रकुमार (तामिळनाडू)- कला

18. सुशील कुमार मोदी (मरणोत्तर) (बिहार)- सार्वजनिक सेवा

19. विनोद धाम (अमेरिका)- विज्ञान आणि अभियांत्रिकी

पद्मश्री पुरस्कार विजेते


1.  आद्वैत चरण गदनायक - कला, ओडिशा
2.  अच्युत रामचंद्र पालव - कला, महाराष्ट्र
3.  अजय व्ही. भट्ट - विज्ञान आणि अभियांत्रिकी, अमेरिका
4.  अनिल कुमार बोरो - साहित्य आणि शिक्षण, आसाम
5.  अरिजित सिंग - कला, पश्चिम बंगाल
6. अरुंधती भटाचार्य - व्यापार आणि उद्योग, महाराष्ट्र
7. अरुणोदय साहा - साहित्य आणि शिक्षण, त्रिपुरा
8. अरविंद शर्मा - साहित्य आणि शिक्षण, कॅनडा
9.  आशोक कुमार महापात्र - वैद्यकीय, ओडिशा
10. अशोक लक्ष्मण सराफ - कला, महाराष्ट्र
11. आशुतोष शर्मा - विज्ञान आणि अभियांत्रिकी, उत्तर प्रदेश
12. अश्विनी भिदे देशपांडे - कला, महाराष्ट्र
13. बैजनाथ महाराज - इतर - आध्यात्म, राजस्थान
14.  बॅरी गॉडफ्रे जॉन - कला, दिल्ली
15.  बेगम बटूल - कला, राजस्थान
16.  भरत गुप्त - कला, दिल्ली
17.  भेरूसिंह चौहान - कला, मध्य प्रदेश
18.  भीम सिंग भवेश - सामाजिक कार्य, बिहार
19.  भीमाव्वा डोडाबालप्पा शिल्लेकीअथारा - कला, कर्नाटका
20.  बधेंद्र कुमार जैन - वैद्यकीय, मध्य प्रदेश
21. सी. एस. वैद्यनाथन - सार्वजनिक कार्य, दिल्ली
22.  चैत्राम देवचंद पवार - सामाजिक कार्य, महाराष्ट्र
23. चंद्रकांत शेठ (मरणोत्तर) - साहित्य आणि शिक्षण, गुजरात
24. चंद्रकांत सोमपुरा - इतर - वास्तुकला, गुजरात
25.  चेतन ई. चित्रणीस - विज्ञान आणि अभियांत्रिकी, फ्रान्स
26.  डेव्हिड आर. स्येमलियह - साहित्य आणि शिक्षण, मेघालय
27.  दुर्गाचरण रणबीर - कला, ओडिशा
28.  फारूक अहमद मीर - कला, जम्मू आणि काश्मीर
29. गणेश्वर शास्त्री द्रविड - साहित्य आणि शिक्षण, उत्तर प्रदेश
30. गीता उपाध्याय - साहित्य आणि शिक्षण, आसाम
31. गोकुलचंद्र दास - कला, पश्चिम बंगाल
32. गुरुवायूर दोराई - कला, तमिळनाडू
33.  हरचंदन सिंह भत्ती - कला, मध्य प्रदेश
34. हरीमण शर्मा - इतर - कृषी, हिमाचल प्रदेश
35. हर्जिंदर सिंह श्रीनगर वाले - कला, पंजाब
36.  हरविंदर सिंह - क्रीडा, हरियाणा
37.  हसन रघु - कला, कर्नाटका
38.  हेमंत कुमार - वैद्यकीय, बिहार
39.  हृदय नारायण दीक्षित - साहित्य आणि शिक्षण, उत्तर प्रदेश
40.  ह्यूग आणि कॉलिन गॅन्टझर (मरणोत्तर)  (विभागून) - साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता, उत्तराखंड
41. इनिवलप्पिल मणी विजय - क्रीडा, केरळ
42.  जगदीश जोशिला - साहित्य आणि शिक्षण, मध्य प्रदेश
43. जसबिंदर नरुला - कला, महाराष्ट्र
44.  जोनास मसेटी - इतर - आध्यात्म, ब्राझील
45. जोयनाचरण बाथारी - कला, आसाम
46.  जुमदे योंगम गॅमलिन - सामाजिक कार्य, अरुणाचल प्रदेश
47. के. दामोदरन - इतर - पाककला, तमिळनाडू
48. के.एल कृष्णा - साहित्य आणि शिक्षण, आंध्रप्रदेश
49. कोमणाकुट्टी अम्मा - कला, केरळ
50. किशोर कुणाल (मरणोत्तर)  - नागरी सेवा, बिहार
51. एल. हंगथिंग - इतर - कृषी, नागालँड
52. लक्ष्मिपाथी रामासुब्बैयेर - साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता, तमिळनाडू
53. लालितकुमार मंगोत्रा - साहित्य आणि शिक्षण, जम्मू आणि काश्मीर
54.  लामा लोबजंग (मरणोत्तर)  - इतर - आध्यात्म, लडाख
55.  लिबिया लोबो सरदेसाई - सामाजिक कार्य, गोवा
56.  एम.डी. श्रीनिवास - विज्ञान आणि अभियांत्रिकी, तमिळनाडू
57. मदुगुला नागफणी शर्मा - कला, आंध्रप्रदेश
58.  महाबीर नायक - कला, झारखंड
59.  ममता शंकर - कला, पश्चिम बंगाल
60.  मंदा कृष्णा मॅडीगा - सार्वजनिक कार्य, तेलंगणा
61.  मारुती भुजंगराव चितांपल्ली - साहित्य आणि शिक्षण, महाराष्ट्र
62.  मिरियाला अर्पारो (मरणोत्तर)  - कला, आंध्रप्रदेश
63.  नागेंद्रनाथ रॉय - साहित्य आणि शिक्षण, पश्चिम बंगाल
64. नारायण (भुलाई भाई) (मरणोत्तर) - सार्वजनिक कार्य, उत्तर प्रदेश
65.  नरेन गुरूंग - कला, सिक्कीम
66.  नीरजा भटला - वैद्यकीय, दिल्ली
67.  निर्मला देवी - कला, बिहार
68.  नितीन नोहरिया - साहित्य आणि शिक्षण, अमेरिका
69.  ओंकारसिंग पाहवा - व्यापार आणि उद्योग, पंजाब
70.  पी. दच्चनमूर्ती - कला, पुद्दूचेरी 
71.  पंड़ी राम मंडावी - कला, छत्तीसगड
72. परमल लव्हजीभाई नागजीभाई - कला, गुजरात
73.  पवन गोएंका - व्यापार आणि उद्योग, पश्चिम बंगाल
74. प्रशांत प्रकाश - व्यापार आणि उद्योग, कर्नाटक
75.  प्रतिभा सत्यपथी - साहित्य आणि शिक्षण, ओडिशा
76.  पुरसाई कन्नप्पा सांबंदन - कला, तमिळनाडू
77. आर. अश्विन - क्रीडा, तमिळनाडू
78.  आर. जी. चंद्रमोगन - व्यापार आणि उद्योग, तमिळनाडू
79.  राधा बाहिन भट - सामाजिक कार्य, उत्तराखंड
80.  राधाकृष्णन देवसेनापथी - कला, तमिळनाडू
81.  रामदर्श मिश्रा - साहित्य आणि शिक्षण, दिल्ली
82. रणेंद्र भानू मजुमदार - कला, महाराष्ट्र
83. रतन कुमार परीमू - कला, गुजरात
84.  रेबाकांत महंता - कला, आसाम
85.  रंथलाई लालरावना - साहित्य आणि शिक्षण, मिझोराम
86.  रिकी ज्ञान केज - कला, कर्नाटका
87. सज्जन भजनका - व्यापार आणि उद्योग, पश्चिम बंगाल
88. सैली होलकर - व्यापार आणि उद्योग, मध्य प्रदेश
89. संत राम देसवाल - साहित्य आणि शिक्षण, हरियाणा
90.  सत्यपाल सिंह - क्रीडा, उत्तर प्रदेश
91.  सेनी विश्वनाथन - साहित्य आणि शिक्षण, तमिळनाडू
92.  सेथुरामन पचनाथन - विज्ञान आणि अभियांत्रिकी, अमेरिका
93.  शेखा शैख अली अल-साबाह - वैद्यकीय, कुवेत
94.  शीन काफ निझाम (शिव किशन बिस्सा) - साहित्य आणि शिक्षण, राजस्थान
95.  श्याम बिहारी अग्रवाल - कला, उत्तर प्रदेश
96.  सोणिया नित्यनंद - वैद्यकीय, उत्तर प्रदेश
97.  स्टीफन नॅप - साहित्य आणि शिक्षण, अमेरिका
98.  शुभाश खेचुलाल शर्मा - इतर - कृषी, महाराष्ट्र
99. सुरेश हरीलाल सोनी - सामाजिक कार्य, गुजरात
100.  सुरिंदर कुमार वासल - विज्ञान आणि अभियांत्रिकी, दिल्ली
101.  स्वामी प्रदीप्तानंद (कार्तिक महाराज) - इतर - आध्यात्म, पश्चिम बंगाल
102.  सयद ऐनुल हसन - साहित्य आणि शिक्षण, उत्तर प्रदेश
103. तेजेंद्र नारायण मजुमदार - कला, पश्चिम बंगाल
104. थियाम सुर्यमुखी देवी - कला, मणिपुर
105.  तुषार दुर्गेशभाई शुक्ला - साहित्य आणि शिक्षण, गुजरात
106.  वदीराज राघवेंद्रचाऱ्य पंचमुखी - साहित्य आणि शिक्षण, आंध्रप्रदेश
107.  वासुदेव कामत - कला, महाराष्ट्र
108.  वेलू आसान - कला, तमिळनाडू
109.  वेंकप्पा अंबाजी सुगतेकर - कला, कर्नाटका
110. विजय नित्यानंद सुरीश्वरजी महाराज - इतर - आध्यात्म, बिहार
111.  विजयालक्ष्मी देशमाने - वैद्यकीय, कर्नाटका
112.  विलास डांगरे - वैद्यकीय, महाराष्ट्र
113. विनायक लोणी - सामाजिक कार्य, पश्चिम बंगाल
 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news