भारतीय तलवारबाजी महासंघ उपाध्यक्षपदी सतेज पाटील

भारतीय तलवारबाजी महासंघ उपाध्यक्षपदी सतेज पाटील
Published on
Updated on

रायपूर (छत्तीसगड) येथे झालेल्या भारतीय तलवारबाजी संघटनेच्या विशेष सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. यात महासंघाच्या अध्यक्षपदी उत्तर प्रदेशचे आमदार पंकजसिंह यांची, तर उपाध्यक्षपदी गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

महासंघाच्या सचिवपदी भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सचिव राजीव मेहता, कोषाध्यक्षपदी छत्तीसगड ऑलिम्पिक महासंघाचे सचिव बशीर अहमद यांची, तर सहसचिवपदी महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे यांची निवड झाली आहे. यानिमित्ताने ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा तलवारबाजीत प्रतिनिधित्व करणार्‍या भवानी देवीचा भारतीय तलवारबाजी महासंघाच्या वतीने 10 लाख रुपये रोख देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी संघटनेचे मुख्य सल्लागार शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजीसंघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश काटुळे, उपाध्यक्ष शेषनारायण लोंढे , कोषाध्यक्ष राजकुमार सोमवंशी, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एस. पी जवळकर, मंजूताई खंडेलवाल, डॉ. दिनेश वंजारे, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news