बोगस डॉक्टरांवर कारवाई करा : राष्ट्रवादीची मागणी

बोगस डॉक्टरांवर कारवाई करा : राष्ट्रवादीची मागणी
बोगस डॉक्टरांवर कारवाई करा : राष्ट्रवादीची मागणी

गगनबावडा ः पुढारी वृत्तसेवा गगनबावडा तालुक्यात बोगस डॉक्टरांचा प्रश्न गंभीर आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी गगनबावडा तालुका राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे केली आहे.जि.प.चे प्रशासन अधिकारी बाबासाहेब लांबे यानी निवेदन स्वीकारले. तालुक्यामध्ये बोगस डॉक्टर चुकीच्या पद्धतीने सेवा देऊन गरीब रुग्णांना लुबाडत आहेत. गगनबावडा हा दुर्गम तालुका आहे. बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. हेच बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळून माया जमविण्याचे काम करत आहेत.

कोणत्याही प्रकारची अ‍ॅलोपॅथिक सेवा देण्याचा अधिकार नसताना हे बोगस डॉक्टर एखाद्या रुग्णावर उपचार करून त्या रुग्णाच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांची यादी जाहीर करावी. गावपातळीवरील या शोधमोहिमेसाठी पोलिसपाटील, कोतवाल, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत शिपाई यांच्याकडून बोगस डॉक्टरांची माहिती गोळा करण्यासाठी त्यांची मदत घेऊन यादी तयार करण्यात यावी. यामुळे गाव पातळीवरील बोगस डॉक्टरांची सत्य परिस्थिती समोर येईल.

बोगस डॉक्टरांचा बंदोबस्त न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर जी. एस. कांबळे, दिलीप पाटील, शबीर नाचरे, कृष्णात चिले, गिरीश प्रभूलकर, श्रीकांत कांबळे आदींच्या सह्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news