नवे पारगावची वृद्धा दुचाकी धडकेत ठार

नवे पारगावची वृद्धा दुचाकी धडकेत ठार
नवे पारगावची वृद्धा दुचाकी धडकेत ठार
Published on
Updated on

वाठार : पुढारी वृत्तसेवा वाठार-कोडोली राज्यमार्गावरील नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील समर्थ टायर्सच्या समोर वाठारहून वारणानगरच्या दिशेने जाणार्‍या मोटारसायकलने धडक दिल्याने नवे पारगाव येथील पार्वती तुकाराम हुजरे (वय 70) या जागीच ठार झाल्या. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

पार्वती हुजरे सकाळी महादेव मंदिराकडे चालत जात होत्या. वारणानगरच्या दिशेने भरधाव आलेल्या मोटारसायकलने (एम. एच. 12 के.वाय. 9576) जोरदार धडक दिली. यात त्या जागीच ठार झाल्या. वडगाव पोलिसांनी मोटारसायकलवरील ओंकार प्रकाश बिरनाळे, प्रकाश बापू बिरनाळे व नीलेश अशोक ऐवाळे (सर्व रा. आळते.ता.हातकणंगले) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news