तलवारी नाचवून यादवनगरात दहशत माजविणारे 5 अटकेत

crime
crime
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा वाहनांची तोडफोड करून यादवनगरसह परिसरात दहशत माजविणार्‍या पाच जणांना राजारामपुरी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी (दि. 7) रोजी ही घटना घडली होती. संशयितांनी तलवारीने हल्ला करून 13 वाहनांची तोडफोड केली होती.

मुजम्मील खुद्दबुद्दीन कुरणे (वय 35, रा. यादवनगर), शाहरूख मुराद मोमीन (32, सुभाषनगर), शाहबाज मुराद मोमीन (32, सुभाषनगर) प्रमोद बाळासाहेब गाडेकर (24, सुभाषनगर), अक्षय विलास शिंदे (23, सुभाषनगर झोपडपट्टी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने पाचही जणांना पोलिस कोठडी सुनावली आहे. वर्चस्व वादातून मुख्य संशयित मुजम्मीलसह साथीदारानी नंग्या तलवारी घेऊन यादवनगरसह परिसरात दहशत माजविली होती. 13 वाहनांची तोडफोड करून दीड लाखाचे नुकसान केले होते. संशयिताच्या मुसक्या आवळल्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news