कोल्हापूर : बिनखांबी मंदिरात गणेशमूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना

कोल्हापूर : बिनखांबी मंदिरात गणेशमूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : महाद्वार रोडवरील बिनखांबी गणेश मंदिरातील मूर्तीवरील 190 वर्षांपासूनचा शेंडुराचा थर काढून देवस्थान समितीच्या वतीने मूर्ती मूळ रूपात आणण्यात आली आहे. या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना रविवारी विविध धार्मिक सोहळ्यांनी झाली. यानिमित्त गणेशयागाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शिखरावरील कलशास क्रेन बकेटच्या सहाय्याने अभिषेक करण्यात आला.

सनई-चौघड्याच्या तालात मंदिरासाठीचे भव्य आकर्षक तोरण वाजत-गाजत आण्यात आले. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे व पत्नी सौ. संयोगिता नाईकवाडे यांच्या हस्ते विविध धार्मिक विधी झाले. मंदिरातील दीपस्तंभाला पंचामृताचा अभिषेक करून कुंभी, कासारी, गुप्त सरस्वती, कृष्णा व भोगावती या नद्यांच्या पाण्याने गंगोत्रीस्नान घातले. पुजारी योगेश व्यवहारे व विकास जोशी यांनी पौरोहित्य केले. आरतीनंतर गणेशमूर्ती भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली. दिवसभरात हजारो भाविकांनी मंदिरातील मूळ रूपातील गणेशमूर्तीचे दर्शन घेतले. कार्यक्रमांचे संयोजन महादेव दिंडे, गणेश नेर्लेकर- देसाई, राहुल जगताप, योगेश पाटील व सहकार्‍यांनी केले.

भाविकांकडून चांदी अर्पण

गणेशमूर्तीला दागिने करण्यासाठी गणेश भक्‍त प्रथमेश योगेश पाटील यांनी अर्धा किलो, मारुतीराव रवळनाथ देसाई यांनी 55 ग्रॅम चांदी आणि पुणे येथील नीता खर्डे-पाटील यांच्याकडूनही चांदीचा हार अर्पण करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news