…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला

…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा संगीतसूर्य केशवराव भोसले यांची तळपती जीवनकहाणी रंगमंचावर पाहण्याची संधी रसिकांना मिळाली. निमित्त होते मी केशवराव संगीत नाटकाचे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचलनालयाच्या वतीने संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित नाट्यमहोत्सवाचे. या नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त केशवराव भोसले यांच्या सांगितीक क्षेत्रातील विविध छटांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी "मी केशवराव" हे नाटक सादर करण्यात येणार आहे. लेखन व दिग्दर्शन किरणसिंह चव्हाण यांनी केले. परिवर्तन कला फाऊंडेशनच्या कलाकारांनी यात केशवराव भोसले यांच्या जीवनपट उलगडला. याला रसिकांचा प्रतिसाद मिळाला.

महोत्सवांतर्गत दि. 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता "आरंभी स्मरितो पाय तुझे" हे संगीत नाटक यतीन माझिरे दिग्दर्शित संक्रमण, पुणे या संस्थेद्वारे सादर करण्यात येणार आहे. या दिवशी सायंकाळी 7 वाजता "लोककलावंतांच्या नजरेतील केशवराव" हा कार्यक्रम लोकशाहीर प्रा. श्याम वानखेडे व शिवशाहीर डॉ. शिवराज शिंदे तसेच अमरावती येथील 25 कलाकारांसह हा कार्यक्रम सादर करणार आहेत. दिनांक 10 ऑगस्ट, 2022 रोजी नटश्रेष्ठ केशवराव भोसले यांच्या जीवनावरील नाट्यमय आठवणी आणि त्यांच्या गाणशैलीवर आधारित "संगीत सूर्यदर्शन" हा कार्यक्रम प्रतिबालगंधर्व विक्रांत आजगावकर सादर करणार असून, त्यांना श्रीरंग परब व अमर देऊलकर हे साथसंगत करणार आहेत.

याच दिवशी सायंकाळी 7 वाजता जगद‍्गुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक भेट घडवणारे "संगीत संत तुकाराम" हे नाटक सादर होणार आहे. या नाटकाचे लेखक बाबाजी राणे आहेत तर दिग्दर्शन संतोष पवार यांचे आहे. या वेळी सौ. संयोगीता चव्हाण, सांस्कृतिक विभागाच्या सुनीता अस्वले, आनंद कुलकर्णी, मोहनराव शिंदे, किरणसिंह चव्हाण, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news