

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी मतदारसंघांची पुनर्रचना निश्चित झाली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे एकूण 68 मतदारसंघ झाले आहेत. मागील वेळच्या तुलनेत यंदा एक मतदारसंघ वाढला आहे. या नव्या रचनेमुळे अनेक भागांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, याचा फायदा-तोटा कुणाचा? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेचे 68 आणि पंचायत समितीचे 134 मतदारसंघ अंतिम करण्यात आले आहेत. यामध्ये करवीर, आजरा, हातकणंगले तालुक्यातील मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात बदल केल्यामुळे काही माजी सदस्यांचे मतदारसंघ विस्कळीत झाले आहेत. त्यांची हक्काची गावे दुसर्या मतदारसंघात गेली आहेत. कोल्हापूर दक्षिणमध्ये महादेवराव महाडिक व सतेज पाटील, तर करवीर विधानसभा मतदारसंघात चंद्रदीप नरके व पी. एन. पाटील गट यांच्यात टोकाचा संघर्ष असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हरकती घेण्यात आल्या होत्या. या दोन विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद गटामध्ये झालेल्या बदलाची चर्चा चांगलीच रंगली आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील काही जिल्हा परिषद गटांमध्ये बदल केल्याने त्याचे परिणाम येणारा काळच सांगेल. चंदगड तालुक्यातही जि.प.च्या गटांची पुनर्रचना चर्चेची बनली आहे.
करवीर, कोल्हापूर दक्षिण व हातकणंगले तालुक्यातील गटात बदल
जि.प.च्या काही माजी सदस्यांच्या गटातील गावे अन्य मतदारसंघात.
कोल्हापूर दक्षिणमध्ये महाडिक विरुद्ध सतेज पाटील गट
करवीरमध्ये चंद्रकांत नरके, राहुल पाटील, सतेज पाटील गट प्रबळ
चंदगडमध्ये शिवाजी पाटील विरुद्ध राजेश पाटील
शाहूवाडी, पन्हाळ्यामध्ये विनय कोरे विरुद्ध मानसिंग गायकवाड व आसुर्लेकर गट
भुदरगड, राधानगरीमध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर विरुद्ध के. पी. पाटील
शिरोळमध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर, माधवराव घाटगे गट, गणपतराव पाटील, राजू शेट्टी प्रबळ
हातकणंगलेत विनय कोरे, धैर्यशील माने, महादेवराव महाडिक, अशोकराव माने, राहुल आवाडे, सुरेश हाळवणकर, राजूबाबा आवळे गट प्रबळ