खाकी वर्दी अंगावर चढण्यापूर्वीच यमगेतील तरुणाची एक्झिट

हृदयविकाराने मृत्यू; परिसरात हळहळ
Kolhapur News
यमगे येथील तरूणाचा ट्रेनिंगला जायच्या आधीच मृत्यू file photo

मुरगूड : यमगे (ता. कागल) येथील स्वप्निल भाट (वय २६) या तरुणाने कष्टातून भरतीचे मैदान मारून पोलिस होण्याचा मान मिळवला होता; मात्र नियतीला हे मान्य झाले नाही. ट्रेनिंगला जायच्या आधीच हृदयविकाराच्या धक्क्याने स्वप्निल हे जग सोडून गेला.

एका कुटुंबासह संपूर्ण मित्र परिवाराचा आणि भाट कुटुंबीयांचा आधार निघून गेला. यमगे येथील सुभाष भाट कष्टातून पुढे आलेले. त्यांचा स्वप्निल हा चिरंजीव गेली तीन वर्षे पोलिस भरतीचा सराव करत होता. याच वर्षी त्याला पोलिस भरतीमध्ये यश मिळाले होते. लवकरच तो ट्रेनिंगसाठी जाऊन त्यानंतर पोलिस म्हणून रुजू होणार होता; मात्र नियतीच्या मनात दुसरेच होते. उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू असणारा स्वप्निलने पोलिसांची वर्दी मिळवली होती. लवकरच त्याचे ट्रेनिंग सुरू होणार होत; मात्र दुपारी जेवणानंतर झोपायला गेलेला स्वप्निल उठलाच नाही आणि स्वप्निल हे जग सोडून गेला. यामुळे संपूर्ण यमगे गाव हळहळले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news