Warana river drowning | वारणा नदीत पोहायला गेलेला नवे पारगावचा तरुण बुडाला

चिकुर्डे पुलाजवळची घटना; दिवसभर शोधकाम सुरू
नवे पारगाव : वारणा नदीत तरुण बुडल्यानंतर शनिवारी दिवसभर नदीकाठावर नातेवाईक बसून होते. इन्सेटमध्ये संकेत कांबळे.
नवे पारगाव : वारणा नदीत तरुण बुडल्यानंतर शनिवारी दिवसभर नदीकाठावर नातेवाईक बसून होते. इन्सेटमध्ये संकेत कांबळे.
Published on
Updated on

नवे पारगाव : चिकुर्डे पुलाजवळील वारणा नदीत पोहायला गेलेला नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील संकेत रंगराव कांबळे (वय 23) हा तरुण बुडाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. शनिवारी दिवसभर रेस्क्यू टीमने बोटीद्वारे शोध सुरू केला होता. मात्र, ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे सायंकाळी सात वाजता शोधमोहीम थांबविली.

वारणा नदीवरील चिकुर्डे बंधार्‍याच्या खालील बाजूस नवीन पुलाच्या खाली संकेत रंगराव कांबळे मित्रांसमवेत शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास पोहायला गेला होता. पोहत असताना खोल पाण्यात तो बुडाला. त्यावेळी नदीकाठाला असलेल्या शेतातील शेतकर्‍यांना तरुण बुडाल्याची जाणीव झाली. मित्रांनीदेखील शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी ठरला. शनिवारी सकाळी 10 पासून कोल्हापूर व सांगली येथील आपत्ती व्यवस्थापन पथकांतील बोटींच्या साहाय्याने शोध घेण्याचे काम दिवसभर सुरू होते. सायंकाळपर्यंत शोध न लागल्याने 7 वाजता मोहीम थांबवली. संकेत हा एकुलता मुलगा होता. त्याने नर्सिंगमधील शस्त्रक्रिया सहायकचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याच्या मागे बहीण आहे. वडील खासगी हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news