

गडहिंग्लज : रस्त्याकडेला ऊस भरून उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून सुभाष शेखर घस्ती (वय 19, रा. मुत्नाळ, ता. गडहिंग्लज) या दुचाकीस्वार युवकाचा सोमवारी पहाटे चारच्या सुमारास मृत्यू झाला. याबाबत ट्रॅक्टरचालक अजित तानाजी जाधव (रा. दुंडगे) याच्यावर गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
सुभाष हा गडहिंग्लज येथील इलेक्ट्रिक दुकानात काम करत होता. दिवसभरातील हे काम संपल्यावर रात्री खासगी बसेस साफसफाई करण्याचे काम आटोपून तो घरी जात असे. दि. 22 रोजीही काम संपवून तो गावी जात असताना दुंडगे गावच्या हद्दीत गवळी यांच्या घरासमोर ऊस भरून ट्रॅक्टर ट्रॉली धोकादायक पद्धतीने लावली होती. सुभाष याच्या दुचाकीची उभ्या ट्रॉलीला जोराची धडक बसली. यातच त्याचा मृत्यू झाला. सुभाष हा अत्यंत कष्टाळू युवक होता. त्याच्या पश्चात आई व तीन बहिणी असा परिवार आहे.