kolhapur Extortion Case | दोन लाखांच्या खंडणीवरून तरुणाला मारहाण; तिघांना अटक; दोघे फरार

kolhapur Extortion Case |
kolhapur Extortion Case | दोन लाखांच्या खंडणीवरून तरुणाला मारहाण; तिघांना अटक; दोघे फरार(File Photo)
Published on: 
Updated on: 

उजळाईवाडी : ‘तुला मस्ती आली आहे का? दोन लाख रुपये मागितले होते, त्याचे काय झाले? आमच्या विरोधात तक्रार करतोस काय?’ असे म्हणत ५ जणांनी एका तरुणाला काठीने व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून दोघे संशयित फरार आहेत.

अभय बाळासाहेब मोरे (वय २५, रा. मोरेवाडी ग्रामपंचायतीजवळ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अमर सतीश माने (रा. कात्यायनी पार्क, कळंबा), आदर्श अरविंद शेंडेकर (रा. योगेश्वरी कॉलनी, पाचगाव) आणि आर्यन संजय मोरे (रा. मोरेवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर ओम पाटील आणि तबलेश शेख हे दोघे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

११ नोव्हेंबर रोजी गोकुळ शिरगाव हद्दीमध्ये मयूर पेट्रोल पंपानजीक खाऊ गल्ली परिसरातील टॉप पान शॉप येथे हा प्रकार घडला. यावेळी पाच संशयितांनी अभय मोरे यांना अडवून दोन लाख रुपयांच्या मागणीचा जाब विचारला. आमच्या विरोधात तक्रार का करतोस, असे म्हणत त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात मोरे जखमी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.