weapon possession case | अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गोकुळ शिरगावात तरुणास अटक

तीन तलवारी, सहा एडक्यांसह 2.43 लाखांचा मुद्देमाल जप्त
weapon possession case
कोल्हापूर : दहशत माजवण्यासाठी आलेल्या संदेश पानारी याला गोकुळ शिरगाव येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. (छाया : अर्जुन टाकळकर)
Published on
Updated on

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथे एडका, तलवारी सोबत घेऊन दहशत माजवणार्‍या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. संदेश सर्जेराव पानारी (वय 26, रा. हणमंतवाडी, सध्या रा. नेर्ली तामगाव, ता. करवीर) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून तीन तलवारी, सहा एडक्यांसह दोन लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

गोकुळ शिरगाव येथे तलवारी, एडका घेऊन पानारी हा दहशत माजवण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार योगेश गोसावी यांना मिळाली. त्यानुसार शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोकुळ शिरगाव येथील सर्व्हिस रोडवरील बाईक पॉईंट गॅरेजजवळ सापळा रचला. काही वेळाने दुचाकीवरून पोत्यामधून काहीतरी घेऊन येताना एक तरुण पथकाच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला अडवून त्याच्याकडे तपासणी केली असता, पोत्यामध्ये सहा धारदार एडके व तीन तलवारी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तलवारी, एडके यासह मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, जालिंदर जाधव, शेष मोरे, अमित मर्दाने, समीर कांबळे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचार्‍यांनी केली.

निपाणीतून आणली शस्त्रे

पोलिसांनी पानारी याच्याकडे असणार्‍या धारदार शस्त्रांबाबत कसून चौकशी केली असता, त्याने ही शस्त्रे निपाणी येथून दहशत माजवण्याच्या उद्देशाने आणल्याची कबुली दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, जालिंदर जाधव, शेष मोरे, अमित मर्दाने, समीर कांबळे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचार्‍यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news