kolhapur Crime : कमरेला पिस्तूल लावून दहशत माजविणार्‍या तरुणास अटक

करवीर पोलिसांची कारवाई
kolhapur Crime News
कमरेला पिस्तूल लावून दहशत माजविणार्‍या तरुणास अटक
Published on
Updated on

कोल्हापूर : कमरेला पिस्तूल लावून पाचगाव, मोरेवाडीसह परिसरात दहशत माजविणार्‍या मोरेवाडी (ता. करवीर) येथील तरुणाला करवीर पोलिसांनी जेरबंद केले. अजय ऊर्फ जोकर सुरेश भिलुगडे (वय 29) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे पिस्तूल व मोबाईल हस्तगत केले आहे.

करवीर पोलिसांनी आठ दिवसांपूर्वी बाल संशयितासह दोघांना अटक करून त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल हस्तगत केले होते. चौकशीत अजय ऊर्फ जोकर भिलुगडे याच्याकडून पिस्तूल खरेदी केल्याचे निष्पन्न झाले होते. करवीर पोलिस भिलुगडेच्या मागावर होते. मात्र, तो चकवा देत होता. गुरुवारी रात्री तो चित्रनगरी मार्गावरून चालत मोरेवाडी येथील घराकडे जात असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, उपनिरीक्षक शंकर कळकुटेसह हवालदार विजय तळसकर, रणजित पाटील यांच्या पथकाने मोरेवाडी येथील स्मशानभूमीजवळ त्याला जेरबंद केले. अंगझडतीत त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले.

उत्तर प्रदेशातून शस्त्रांची तस्करी

भिलुगडे याच्याविरुद्ध कुरळप (सांगली) येथे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होता. त्यातून त्याची निर्दोष सुटका झाल्यानंतर त्याने उत्तर प्रदेशातून दीड वर्षापूर्वी गावठी बनावटीची दोन पिस्तूल खरेदी केली होती. त्यापैकी एकाची विक्री केली होती, तर एक स्वत:जवळ बाळगून दहशत माजवत होता, अशी माहिती चौकशीतून पुढे आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news