

कोल्हापूर : राजारामपुरी येथील राणीबाग परिसरात गांजा तस्करी करणार्या संशयिताला राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. संतोष रामसिंग गौतम (वय 28, रा. नवश्या मारुती मंदिराजवळ) असे त्याचे नाव आहे.
संशयिताकडून 30 हजार 450 रुपये किमतीचा 1 किलो 218 ग्रॅम गांजा व मोपेड हस्तगत करण्यात आली. गांजासाठा कोणाकडून व कोणासाठी आणण्यात आला होता हे लवकरच स्पष्ट होईल, असे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक दत्तात्रय भोजणे यांनी सांगितले.