kolhapur | पंचगंगा घाटावर बसला अन् बकाबक लिंबू खाऊ लागला

पाडव्यादिवशीचा विचित्र प्रकार; बघ्यांची गर्दी
kolhapur |
kolhapur | पंचगंगा घाटावर बसला अन् बकाबक लिंबू खाऊ लागला
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : दिवाळी पाडव्याच्या दिवशी पंचगंगा नदीच्या घाटावर पायऱ्यांवर बसून एक तरुण बकाबक लिंबू खात असल्याचे चित्र पहायला मिळाले. तरुणाभोवती गर्दी जमली. सोशल मीडियावरून हा व्हिडीओ व्हायरल झाला. यामुळे सर्वत्र त्या तरुणाची चर्चा रंगली होती.

पाडव्यादिवशी नदी घाटावरील पाण्याजवळील पायरीवर बसून एक तरुण हिरव्या कापडात बांधलेले लिंबू न कापता अखंड खात बसला होता. नदी घाटावर म्हशींच्या मिरवणुकीसाठी जमलेले लोक या तरुणाभोवती जमा झाले. काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला हा तरुण घाटावर अंथरलेल्या हिरव्या कापडावरील लिंबू कापून हाताने फोडून थेट खात होता. त्याने जवळपास एक डझनपेक्षा जास्त लिंबू तोंडात पिळून, चावून खाल्ले. कडक उन्हात चाललेला हा सर्व प्रकार शेकडो तरुण सुमारे अर्धा तास पाहात होते. अनेकांनी त्याची चेष्टा केली, तर काहींनी याचे व्हिडीओ काढून रील बनवले. मात्र, त्या तरुणाला या कशाचेही भान नव्हते.

तरुण दौंडचा

मानसिक संतुलन बिघडलेला हा तरुण दौंड (जि. पुणे) येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दौंड तालुक्यातून त्याच्या नातेवाईकांची कमेंटमध्ये प्रतिक्रिया आली. त्यावरून या तरुणाची ओळख पटली आहे. त्याचे नाव आकाश ऊर्फ बाबूराव संजय गुन्नर असे आहे. तो एका शेतकऱ्याचा मुलगा असून त्याचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. यापूर्वीही तो असाच दोन-तीन वेळा घरातून बाहेर पडला असल्याची माहिती मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.