Uchgaon accident news | उचगाव येथे अपघातात युवकाचा मृत्यू; एक गंभीर

चारचाकीची दुचाकीला धडक
Uchgaon accident news |
Uchgaon accident news | उचगाव येथे अपघातात युवकाचा मृत्यू; एक गंभीर
Published on
Updated on

गांधीनगर : दुचाकीमध्ये पेट्रोल भरून घरी परतत असताना दुचाकी आणि चारचाकी यांची समोरासमोर धडक होऊन प्रेम सर्जेराव दाभाडे (वय 22, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) या युवकाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र सोहम संदीप सकटे (16, रा. गडमुडशिंगी) गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री हुपरी-कोल्हापूर रोडवर उचगाव येथे घडली. याबाबतची फिर्याद सचिन विलास चौगुले (वय 29, रा. कोल्हापूर) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली.

प्रेम आणि त्याचा मित्र सोहम दुचाकीवरून उचगाव हद्दीतील पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरून घरी परतत होते. त्यादरम्यान हुपरीकडून कोल्हापूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या चारचाकीने समोरासमोर जोरदार धडक दिली. यामध्ये प्रेम दाभाडे आणि सोहम सकटे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यादरम्यान गडमुडशिंगीचे माजी सरपंच जितेंद्र यशवंत आणि कार्यकर्त्यांनी त्यांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून एका खासगी रुग्णालयात हलवले. उपचार सुरू असताना प्रेम दाभाडे याचा पहाटे मृत्यू झाला. दरम्यान चारचाकी चालक सूर्यकांत राजेंद्र भोसले (वय 45, रा. राजारामपुरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला गांधीनगर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news