Heart Attack | पोलिस भरतीचे स्वप्न अधुरे; धावताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

नंदवाळ येथील घटना
young man dies of heart attack
सुनील कांबळेPudhari File Photo
Published on
Updated on

वाशी : पोलिस दलात भरती होऊन कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या तरुणावर काळाने घाला घातला. नंदवाळ (ता. करवीर) येथील सुनील वामन कांबळे (वय 32) याचा सोमवारी पहाटे धावण्याचा सराव करताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

सुनील गरीब कुटुंबातील होता. कुटुंबाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी तो जिद्दीने पोलिस भरतीची तयारी करत होता. सोमवारी पहाटे 6 वाजता तो वाशी-नंदवाळ मार्गावर धावत होता. अवनी संस्थेजवळ आला असता, त्याच्या छातीत अचानक तीव्र कळ आली आणि तो जमिनीवर कोसळला. सोबतच्या मित्रांनी त्यास तत्काळ रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

सुनील याच्या अकाली जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील आणि चार बहिणी असा परिवार आहे. एका होतकरू तरुणाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news