

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
योगगुरू रामदेव बाबा यांनी आज करवीर निवासिनी आई श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. सोबतच अंबाबाई मंदिरातील मातृलिंग मंदिरात दर्शन घेत त्यांनी ध्यान केले.
यावेळी रामदेव बाबा यांना देवस्थान समितीकडून श्री अंबाबाई देवीची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार धनंजय महाडिक हे देखील उपस्थित होते.