

एकनाथ नाईक
कोल्हापूर : राज्यात 1 हजारपैकी 18 जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या आहे. देशात महाराष्ट्र पाचव्या स्थानी असून गोव्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 49.4 जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या आहे. वाढते वय, जीवनशैतील बदल, प्रदूषण, मोबाईल, लॅपटॉपमधून निघणारे विकिरण, व्यसने आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही वंध्यत्व वाढीची कारणे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
महिलेचे वय 35 पेक्षा जास्त असेल आणि 6 महिन्यांहून अधिक काळ प्रयत्न करूनही मूल होऊ शकले नाही, तर ही वंध्यत्व स्थिती असते. भारतात 1 हजार पैकी 18. 7 जोडप्यांला वंध्यत्वाची समस्या आहे. ही समस्या फक्त महिलांशी संबंधित नाही. एनएफएचएसच्या आकडेवारीनुसार वंध्यत्वाच्या एकूण प्रकरणांपैकी 30 ते 40 प्रकरणे पूर्णपणे पुषांशी संबंधित असतात. त्यामुळे वंध्यत्व समस्या स्त्री व पुरुष दोघांना असू शकते.