kolhapur | कामगार रस्त्यावर; श्रमसंहितांना विरोध

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : अंगणवाडी सेविका, बँक, खासगी कंपनी कर्मचारी सहभागी
कोल्हापूर : जिल्ह्यातील कामगारांनी संप करत सोमवारी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला.
कोल्हापूर : जिल्ह्यातील कामगारांनी संप करत सोमवारी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या चार श्रमसंहितांविरोधात 10 केंद्रीय कामगार संघटना आणि अनेक फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 12) देशभरातील कामगारांनी संपाचे हत्यार उपसले. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. तत्काळ चार श्रमसंहिता रद्द करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना मागण्यांचे निवेदन दिले.

दिगे म्हणाले, चार श्रमसंहितांमुळे कामगारांची अवस्था गुलामासारखी होण्याचा धोका आहे. नोकर्‍या उद्ध्वस्त करण्याचे हे धोरण आहे. त्यामुळे चार श्रमसंहिता रद्द करून 29 कामगार कायदे पुन्हा बहाल करावेत; अन्यथा तीव— आंदोलन करू. सुवर्णा तळेकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ज्याप्रमाणे लढा उभारला तसा आता उभारण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. कॉ. दिलीप पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी औद्योगिक कामगार, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, बांधकाम कामगार, हॉस्पिटलमधील कर्मचारी, राष्ट्रीयीकृत, जिल्हा बँकेतील कर्मचारी मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामगारांनी ठरवले तर देश बंद पडेल

‘पैसा फेक, तमाशा देख’ असे सरकारचे धोरण आहे. कंत्राटीकरणाला प्रोत्साहन देणार्‍या चार श्रमसंहिता कोरोनामध्ये मंजूर केल्या. या तत्काळ रद्द कराव्यात; अन्यथा कामगारांनी ठरवले तर देश बंद पडेल, असा इशारा कॉम—ेड चंद्रकांत यादव यांनी दिला.

आता तुम्हीही कामगारांचा आवाज दाबणार काय?

जिल्हाधिकार्‍यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे मिटिंग सुरू होती. कार्यालयाबाहेर कामगार नेत्यांची भाषणे, घोषणाबाजी सुरू होती. यामुळे मिटिंगला अडथळा येत होता. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी प्रवेशद्वाराजवळ येऊन स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितले. यावर संतप्त कॉ. दिलीप पवार यांनी अगोदरच सरकार आमचा आवाज दाबत आहे. तुम्हीही येथे तेच करता का? असा सवाल केला. यावर गुरव यांनी 20 मिनिटांसाठी कमी आवाज करा, असे सांगितले. यानंतर संयोजकांनी स्पीकरची दिशा बदलली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news