कामगाराने मारला मालकाच्या तिजोरीवर डल्ला

रुक्मिणीनगरातील चोरीचा 48 तासांत छडा
 worker-steals-from-employer-safe
कोल्हापूर : रूईकर कॉलनी, रुक्मिणीनगर येथील गोदामातील तिजोरी फोडून 9 लाख 80 हजारांची रोकड लंपास करणार्‍या राजस्थानातील संशयिताला उत्तर प्रदेश (गाझियाबाद) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चोरीतील रोकड हस्तगत करण्यात आली.Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : रूईकर कॉलनी परिसरातील रुक्मिणीनगर येथील गुरुनानक सोसायटीसमोर सौंदर्य प्रसाधन साहित्याच्या गोदामातील तिजोरी फोडून लुटलेल्या 9 लाख 80 हजार रुपयांच्या चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषनने अवघ्या 48 तासात छडा लावला. मालकाच्या घरी चोरी करणार्‍या कामगाराला उत्तर प्रदेश (गाझियाबाद) येथे शुक्रवारी पहाटे बेड्या ठोकल्या.

गोविंदप्रसाद भवरलाल नायक (वय 23, रा. रतनगेट रोड, वीर छापरगाव, जि. चुरू, राजस्थान) असे त्याचे नाव आहे. संशयिताकडून 9 लाख 80 हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली, असे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक निरीक्षक चेतन मसुटगे यांनी सांगितले. व्यापारी राजू राम केसरी यांच्या मालकीचे सौंदर्य प्रसाधन विक्री आणि होलसेल उलाढालीचे रूईकर कॉलनी परिसरात रुक्मिणीनगर येथील मध्यवर्ती परिसरात गोदाम आहे. बुधवारी (दि. 19) रोजी भरदिवसा गोदाम फोडून चोरट्याने तिजोरीतील 9 लाख 80 हजारांची रोकड लंपास केली. भरदिवसा घडलेल्या प्रकारामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली. परिसरातील 27 कॅमेर्‍यांतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.

एका अनोळखी तरुणाचा चेहरा निष्पन्न झाला. तोंडाला मास्क घातलेल्या अवस्थेत यात्री निवासमध्येही त्याने एक दिवस मुक्काम केल्याचे निदर्शनास आले. व्यापारी राजू केसरी यांना फुटेज दाखविण्यात आले. त्यांनी संशयित तरुण राजस्थान येथील असल्याचे सांगितले. मात्र, त्याचा सविस्तर पत्ता उपलब्ध झाला नाही. रेल्वे स्थानकावरीलही सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. संशयित तरुण कपडे बदलून रेल्वेने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळाली. सहायक निरीक्षक चेतन मसुटगे, शुभम संपकाळ, विशाल चौगुले, संदीप बेंद्रे, विजय इंगळे, सचिन पाटील, अमित सर्सजे यांच्यासह पथक दिल्लीला रवाना झाले. तेथील फुटेजमध्ये संशयित आढळून आला. तेथून त्याने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील औद्योगिक वसाहतमधील कारखाना गाठला. पाठोपाठ पोलिसांनीही कारखाना गाठला. संशयिताला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडील बॅगेमध्ये चोरीच्या गुन्ह्यातील 9 लाख 80 हजारांची रोकड आढळून आली. संशयितास ताब्यात घेऊन त्यास येथे आणण्यात आल्याचेही रवींद्र कळमकर यांनी सांगितले.

असा आखला चोरीचा बेत

संशयित गोविंदप्रसाद नायक हा महिन्यापूर्वी व्यापार्‍याकडे कामाला होता. त्यांच्या धंद्यातील उलाढालीची त्याने माहिती घेतली. गोदामात फारसे कोणी नसते, हे त्याने हेरले. काम सोडून संशयित राजस्थानला गेला. तेथून गाझियाबाद येथील कारखान्यात कामाला लागला. काहीकाळ काम केल्यानंतर त्याला नायक यांच्या गोदामात असणार्‍या लाखो रुपयांची आठवण झाली आणि त्याने चोरीचा बेत रचला, अशीही माहिती चौकशीत निष्पन्न झाल्याचे सहायक निरीक्षक चेतन मसुटगे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news