Zilla Parishad | शिक्षक भरतीत महिलांची बाजी; ११५ जणांना मिळाली नियुक्तीपत्रे

९८ प्राथमिक शिक्षकांमध्ये ७६ महिला
Zilla Parishad |
Zilla Parishad | शिक्षक भरतीत महिलांची बाजी; ११५ जणांना मिळाली नियुक्तीपत्रे
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत समांतर आरक्षणातील रूपांतरण राऊंडमधून ११५ शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. या निवडीमध्ये महिला शिक्षकांनी बाजी मारली असून, एकूण नियुक्त्यांमध्ये ७६ शिक्षिकांचा समावेश आहे. विशेषतः पहिली ते पाचवीच्या अध्यापक पदावर नियुक्त झालेल्या ९८ जणांमध्ये तब्बल ७६ शिक्षिका आहेत.

या भरती प्रक्रियेत पहिली ते पाचवीच्या अध्यापक पदाच्या ९८ जागा भरण्यात आल्या. यामध्ये ७६ महिला आणि २२ पुरुष शिक्षकांचा समावेश आहे. अध्यापक (सेमी इंग्रजी) संवर्गातील पाच जागांवरही नियुक्त्या करण्यात आल्या. तसेच सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या १० आणि माध्यमिक शिक्षकांच्या दोन जागा भरण्यात आल्या. अशा एकूण ११५ शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, शिक्षण समिती सभापती शीतल यादव, समाजकल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, शिक्षणाधिकारी अशोक घुगे, उपशिक्षणाधिकारी मोहन कावडे, विस्तार शिक्षण अधिकारी विश्वास सुतार, रवींद्र ठोकळे, रत्नप्रभा दबडे, याकूब सदलगे आदींच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती प्रक्रिया पार पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.