kolhapur | प्राणी बचाव, आपत्ती व्यवस्थापन, साहसी क्षेत्रातही महिला अग्रेसर

कोल्हापूरच्या मुलींचा सक्रिय सहभाग
कोल्हापूर :  पर्यावरणातील सर्प-विंचू यांचे रेस्क्यू करताना प्राची तानवडे व अश्विनी जाधव -कसबेकर.
कोल्हापूर : पर्यावरणातील सर्प-विंचू यांचे रेस्क्यू करताना प्राची तानवडे व अश्विनी जाधव -कसबेकर.
Published on
Updated on

सागर यादव

कोल्हापूर : घर-संसार, शिक्षण-करिअर या जबाबदार्‍या सांभाळत शाहूनगरी कोल्हापूरच्या महिला- मुली पर्यावरणीय घटक असणार्‍या सर्प-प्राणी बचाव, आपत्ती व्यवस्थापनासह गिर्यारोहणा सारख्या साहसी क्षेत्रातही अग्रेसर आहेत. संकटात सापडलेल्या वन्यजीव, सर्प, पक्षी यांना रेस्क्यू करणे, पूर, भूकंप व तत्सम आपत्तीत लोकांची मदत करणे अशा अवघड कामातही कोल्हापूर जिल्ह्यातील महिला-मुली सक्रिय आहेत.

रणरागिणी ताराराणींची राजधानी असणार्‍या कोल्हापुरात महिला -मुलींनी विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खादा लावून वाटचाल सुरू ठेवली आहे. स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी कारवायांपासून ते कुस्ती सारख्या रांगड्या खेळातही कोल्हापूरच्या महिलांचा दबदबा कायम राहिला आहे. आधुनिक काळात तर कोल्हापूरच्या महिला-मुलींनी फुटबॉल, क्रिकेट, मोटार स्पोर्टस्, गिर्यारोहण या सारख्या खेळांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कोल्हापूरचे नाव नावारुपाला आणले आहे.

प्राणी-पक्षांचे रेस्कू कार्य सर्प मैत्रिण अश्विनी जाधव-कसबेकर, स्नेहा जाधव, श्वेता सुतार, प्राची तानुगडे, इरा बकरे या कोल्हापुरातील मुलींनी छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशन व सह्याद्री शिलेदार सेवा संघांच्या माध्यमातून निसर्गातील महत्त्वाचे घटक असणारे विषारी-बिनविषारी सर्प, छोटे-मोठे प्राणी-पक्षी यांच्या रेस्क्यूसाठीच्या मोहिमांमध्ये योगदान सुरू ठेवले आहे. बर्डस् ऑफ कोल्हापूरच्या माध्यमातून पक्षी जगतासाठी ॠतुजा पाटील या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. इचलकरंजी येथील वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माध्यमातून रेवती बोरवणकर व गौरी गोखले यांनी आपले कार्य अखंड सुरू ठेवले आहे.

संकटकाळातही अखंड सेवा

व्हाईट आर्मी व जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या माध्यमातून कस्तुरी रोकडे, डॉ. शर्वरी अशोक रोकडे, निलोफर मुजावर, आकांक्षा पाटील, साक्षी गोरे, सानिका मेडशिंगे, अमृता पाटील, सागरीका भोसले, सानिका पोवार, यांनी यात्रा- जत्रांसह, कोव्हिड-पूर, कावीळ सारख्या संकट काळात मदत, आरोग्य, अन्नछत्र, औषधोपचार अशा लोकसेवेचे कार्य अखंड सुरू ठेवले आहे.

गिर्यारोहण क्षेत्रातही आघाडीवर

कोल्हापूरच्या मुली गिर्यारोहण सारख्या साहसी क्षेत्रातही आघाडीवर आहेत. हिमालय पर्वतातील उंच शिखरांबरोबरच सह्याद्रीतील अभेद्य गडकोट किल्ल्यांच्या पदभ—मंती मोहिमांमध्ये कोल्हापूरच्या मुली आघाडीवर आहेत. समिट अ‍ॅडव्हेंचर्स, हिलरायडर्स, सह्याद्री प्रतिष्ठान यासह विविध संस्था-संघटनांच्या माध्यामातून खुशी कांबोज, कस्तुरी सावेकर, बाल गिर्यारोहक अन्वी घाटगे आदी मुलींनी गिर्यारोहण क्षेत्रात आपली वाटचाल अखंड सुरू ठेवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news