‘स्वीकृत’ निवडी रद्द मागणीसाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

महापालिकेत तणावपूर्ण वातावरण; पोलिसांनी घेतले ताब्यात
कोल्हापूर ः महापालिकेत आत्महदनाचा प्रयत्न करणार्‍या महिलेला रोखताना महिला पोलिस.
कोल्हापूर ः महापालिकेत आत्महदनाचा प्रयत्न करणार्‍या महिलेला रोखताना महिला पोलिस.
Published on
Updated on

कोल्हापूर : नियमबाह्य केलेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी रद्द कराव्यात, या मागणीसाठी महापालिकेत एका महिलेने बुधवारी (दि. 25) सायंकाळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. दलित मानवाधिकार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा काजल कांबळे असे त्यांचे नाव आहे.

पोलिस आणि महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना रोखले. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात नेऊन नंतर त्यांना सोडून दिले. दरम्यान, घटनेमुळे महापालिकेत तणावाचे वातावरण झाले होते. 20 फेब्रुवारी रोजी कांबळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार सकाळी 7 पासून अग्निशमन दलाचे जवान महापालिकेच्या गेटवरच थांबले होते. पोलिसही त्यांच्या संपर्कात होते. सायंकाळी पाचच्या सुमारास कांबळे महापालिकेत आल्या. पोलिस व अग्निशमन दलाचे जवान त्यांना अधिकार्‍यांना भेटण्यासाठी घेऊन जात होते. परंतु, महापालिका चौकात गेल्यानंतर त्यांनी रॉकेलची बाटली काढली. महिला पोलिसांनी बाटली हिसकावून घेत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी झालेल्या झटापटीत रस्त्यावर रॉकेल सांडले. पोलिस हेडकॉन्स्टेबल एकनाथ कळंत्रे, कॉन्स्टेबल शुभांगी शिंगन, अग्निशमनचे चालक उदय शिंदे, जवान उदय शिंदे, संग्राम पाटील आदींनी कांबळे यांना रोखून पोलिस ठाण्यात नेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news