

धीरज बरगे
कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीत ठरावांच्या नियमावलीकडे सर्वांचे लक्ष आहे. नियमाबाहेर असलेले ठराव टार्गेटवर असणार आहेत. कोर्या ठरावांसह आता एकाच व्यक्तीच्या नावे एकापेक्षा अधिक ठराव असल्यास ते ठराव बाद ठरणार आहेत. दाखल ठरावांची यादी पाहता गोकुळमधील नेत्यांच्याच नावे एकाहून अधिक ठराव आहेत.
आ. सतेज पाटील यांच्या नावे दोन ठराव
आमदार सतेज पाटील यांच्या नावे गगनबावडा व करवीर तालुक्यातून प्रत्येकी एक असे दोन ठराव आहेत. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नावे गगनबावडा आणि हातकणंगले तर पूजा ऋतुराज पाटील यांच्या नावे करवीर व हातकणंगले तालुक्यातून ठराव दाखल केला आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावे सहा ठराव
कागल तालुक्यातून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावे सर्वाधिक सहा ठराव आहेत. गोकुळचे माजी चेअरमन नवीद मुश्रीफ, तिलतअमरिन नवीद मुश्रीफ, अबीद मुश्रीफ यांच्या नावे प्रत्येकी दोन, समरजितसिंह घाटगे यांच्या नावे तीन, नवोदिता घाटगे दोन, वीरेंद्र मंडलिक यांच्याही नावे दोन ठराव आहेत.
राहुल पाटील तीन, तेजस्विनी पाटील यांचे चार ठराव
करवीर तालुक्यातून जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नावे तीन तर तेजस्विनी राहुल पाटील यांच्या नावे चार ठराव आहेत.
आमदार चंद्रदीप नरके यांच्या नावे तीन ठराव
आमदार चंद्रदीप नरके यांच्या नावे पन्हाळा तालुक्यातून तीन, राजवीर अजित नरके यांच्या नावे करवीर, गगनबावडा तालुक्यातून प्रत्येकी एक, शिल्पा अजित नरके यांच्याही नावे दोन ठराव आहेत. राजलक्ष्मी चंद्रदीप नरके, देवराज नरके, अजित नरके यांचा प्रत्येकी एक ठराव आहे. गोकुळचे ज्येष्ठ नेते अरुण नरके, सत्यशिल संदीप नरके, जयश्री संदीप नरके, डॉ. चेतन नरके, संदीप नरके, स्निग्धा नरके यांच्या नावे प्रत्येकी एक ठराव आहे.
अनिता डोंगळेंचे चार ठराव
गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, अभिषेक डोंगळे, अमृता डोंगळे यांच्या नावे प्रत्येकी एक तर अनिता अरुण डोंगळे यांच्या नावे गडहिंग्लज, करवीरमधून एक तर राधानगरी तालुक्यातून दोन असे एकूण चार ठराव आहेत.
आ. यड्रावकर यांच्यात दोन ठराव
आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, संजय पाटील-यड्रावकर, अजय पाटील-यड्रावकर यांच्या नावे प्रत्येकी एक तर स्वरुपा पाटील-यड्रावकर, सानिका पाटील-यड्रावकर यांच्या नावे प्रत्येकी दोन ठराव आहेत.
महाडिक यांच्यात प्रत्येकी एक ठराव
माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक, गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक असे महाडिक कुटुंबातील तीन ठराव असून प्रत्येकाच्या नावे एक ठराव आहेत.