

गारगोटी : खेडगे (ता. भुदरगड) येथे गावठी बॉम्बच्या साह्याने रान डुकराची शिकार केल्याप्रकरणी सरपंचासह आठ जणांना अटक करण्यात आली. संशयितांच्या घरातून डुक्कराचे मांस ताब्यात घेतले आहे. संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तायनाक यांनी वर्तवली आहे.
खेडगे येथील दूरगाडी शेतात सोमवारी रात्री गावठी बॉबम्ने रानटी डुकराची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच वनविभागाने रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवले. याप्रकरणी प्रकाश हैबती देसाई (वय 59), शंकर धनाजी घोरपडे (50), जनार्दन शिवराम देसाई (58), सुभाष तुकाराम देसाई (46), संतोष बबन देसाई (47), सुभाष बाबासो देसाई (44), अंतोबा यशवंत कांबळे (78) या संशयितांच्या घराची झडती घेऊन रान डुकराचे मांस ताब्यात घेतले. या सर्वांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुख्य संशयित सरपंच युवराज एकनाथ देसाई फरार होता. सायबर सेलच्या मदतीने त्यास अटक केली आहे. गारगोटी वनपरिक्षेत्र अधिकारी तायनाक यांच्यासह वनपाल बळवंत शिंदे, एम. बी. काशीद, वनरक्षक वनिता कोळी, आशिष चाळसकर, वर्षा तोरसे, संजय गौड यांनी ही कारवाई केली.