Wife Murder Case | चारित्र्याच्या संशयाने पत्नीचा डोक्यात वीट घालून खून

पन्हाळ्यातील घटना; पती पोलिसांच्या ताब्यात
Wife Murder Case
Wife Murder Case | चारित्र्याच्या संशयाने पत्नीचा डोक्यात वीट घालून खून
Published on
Updated on

पन्हाळा : पन्हाळा येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने डोक्यात सिमेंट काँक्रीटची वीट घालून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. कांचन रमेश धडेल (वय 55) असे मृत महिलेचे नाव असून, पोलिसांनी पती रमेश बाबुराव धडेल (64) याला ताब्यात घेतले आहे. या घटनेने पन्हाळा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मूळचे केर्ले (ता. करवीर) येथील असलेले धडेल दाम्पत्य सध्या पन्हाळा येथील किशोर चंदवाणी यांच्या बंगल्यावरील वॉचमन रूममध्ये वास्तव्यास होते. आरोपी रमेश धडेल हा गेल्या काही काळापासून पत्नी कांचन हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या संशयावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. आरोपी रमेश हा नेहमी कांचन यांना शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही देत असे.

बुधवारी (दि. 4) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पन्हाळा येथील गौरी डायनिंग हॉटेलच्या शेजारी असलेल्या चंदवाणी यांच्या बंगल्याच्या टेरेसवर पुन्हा एकदा याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी संतापाच्या भरात रमेश धडेल याने जवळच असलेली सिमेंट काँक्रीटची वीट उचलून पत्नीच्या डोक्यात घातली. हा वार इतका भीषण होता की, कांचन यांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी मृत महिलेचा जावई शहाजी दगडू साळवी (32, रा. काळजवडे) यांनी पन्हाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पन्हाळा पोलिसांनी आरोपी पती रमेश धडेल याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पन्हाळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी घटनास्थळी भेट दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news