Bhadole murder Case | भादोलेत कोयत्याचे वार करून पत्नीचा खून

Bhadole murder Case
Bhadole murder Case | भादोलेत कोयत्याचे वार करून पत्नीचा खूनFile Photo
Published on
Updated on

पेठवडगाव : भादोले (ता. हातकणंगले) येथील रोहिणी प्रशांत पाटील (वय 29) हिचा पती प्रशांत मारुती पाटील ऊर्फ गुंडा मिस्त्री याने कोयत्याचे वार करून खून केला. खुनाचे कारण समजू शकले नाही. पसार पतीचा वडगाव पोलिसांनी शोध सुरू केला आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास भादोले-कोरेगाव रस्त्यावरील ओढ्याच्या पुलाजवळ ही घटना घडली.

प्रशांत याचा भादोले ग्रामपंचायत गाळ्यात दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय आहे. त्याचा आठ वर्षांपूर्वी ढवळी (ता. वाळवा) येथील रोहिणी हिच्याशी विवाह झाला. त्यांना एक तीन वर्षांची व एक सहा वर्षांची अशा दोन मुली आहेत. त्याचे सासरे आजारी असल्याने वारंवार रोहिणीस तिकडे जावे लागत होते. दुपारी दोघेही दुचाकीवरून ढवळीला गेले होते. रात्री आठच्या सुमारास परत येत असताना वारणा नदीचा पूल ओलांडल्यानंतर गावाच्या बाजूस असणार्‍या ओढ्याजवळ गाडी थांबवून प्रशांतने रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकली आणि कोयत्याने डोकीत सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने रोहिणी जागीच कोसळली. डोक्यात व मानेवर वर्मी वार झाल्याने रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. हे वार चुकविण्याच्या प्रयत्नात रोहिणीच्या दोन्ही हातांवरही कोयत्याचे वार झाल्याचे आढळून आले.

घटनास्थळी हातोडाही पडला होता. निर्मनुष्य ठिकाण, त्यात रात्रीची वेळ असल्याने रोहिणीला बचावासाठीही वेळ मिळाला नाही. रोहिणीच्या अंगावरच कोयता टाकून प्रशांत तिथून निघून गेला. त्याने घरी जाऊन आपण रोहिणीचा खून करून आलो असल्याचे सांगितले. यामुळे हादरलेल्या या कुटुंबीयांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता रोहिणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. वडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, ही खुनाची घटना समजताच रोहिणीचे माहेर असणार्‍या ढवळी येथील शेकडो ग्रामस्थ व नातलगांनी भादोले येथे धाव घेतली. संतप्त झालेले हे सर्वजण संशयित प्रशांत याचे गॅरेजसमोर जमले होते. प्रशांत याला शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news