Vishalgad Encroachment | गजापुरातील ४१ नुकसानग्रस्त कुटुंबांना व्हाईट आर्मीकडून मदतीचा हात

वैद्यकीय सुविधेचा २०० लोकांना लाभ  

Vishalgad Encroachment
गजापूर येथील नुकसानग्रस्त कुटुंबांना व्हाईट आर्मीकडून वैद्यकीय व प्रापंचिक साहित्याची मदत करण्यात आली.Pudhari News Network
Published on
Updated on

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : गजापूर (ता.शाहूवाडी) येथील मुसलमानवाडीतील विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेवेळी आंदोलनकर्त्यांनी मोठा हिंसाचार केला. यामध्ये ४१ कुटुंबे उघड्यावर आलीत. त्यांच्या मदतीसाठी कोल्हापूर येथील व्हाईट आर्मी धावून गेली आहे. मागील चार-पाच दिवसांपासून व्हाईट आर्मीच्या वतीने नुकसानग्रस्त लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करून त्यांना त्यांचे जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशीपासून अन्नछत्र उभारून दुर्घटनाग्रस्त झालेल्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना सकाळ-संध्याकाळ जेवणाची सोय करत आहेत. त्याचबरोबर विशाळगड व नुकसानग्रस्त घटनास्थळी लावलेल्या मेडिकल कॅम्पमध्ये २०० रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला.


Vishalgad Encroachment
Vishalgad Encroachment | विशाळगडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईला हायकोर्टाची स्थगिती

अत्यावश्यक वस्तू घरपोच

प्राथमिक स्वरूपात लागणारे धान्य, भांडी व ब्लॅंकेट, चादर आदीसह अत्यावश्यक वस्तू घरपोच करण्यात आले. त्याचबरोबर दहशती व तणावाखाली असलेल्या लहान मुले, वयोवृद्ध महिला, पुरुषांना वैद्यकीय सुविधा व्हाईट आर्मी डॉक्टरांमार्फत देण्यात आली. मुसलमानवाडी, गडकरीवाडी, प्रभुळकरवाडी, त्याचबरोबर विशाळगडावरील जवळपास सव्वाशे लोकांना सर्दी, ताप, खोकला, अशक्तपणा, डोकेदुखी यावर औषध देण्यात आली.


Vishalgad Encroachment
Vishalgad Encroachment | विशाळगड हिंसाचारग्रस्त कुटुंबीयांचे सर्व नुकसान सरकार भरून देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

'या' लोकांचे मदतकार्यासाठी सहकार्य

डॉक्टर पथकाचे प्रमुख डॉक्टर नंदकुमार जाधव दोन दिवस गडावर थांबून उपचार करत आहेत. साहित्य व धान्य या मदत कार्यासाठी आमदार ऋतुराज पाटील, उज्वल नागेशकर, संजय नरसिंघानी, शाहूवाडीचे प्रांत समीर शिंगटे, गजापूर येथील माजी सरपंच संजयसिंह पाटील, इमाम प्रभुळकर, दिलावर महालदार यांनी विशेष सहकार्य केले. व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांचे पथक त्याचबरोबर प्रशांत शेंडे, हनुमंत कुलकर्णी, विजय भोसले, कस्तुरी रोकडे, आदित्य सणगरे, श्रीकांत पाटील, शैलेश रावण, येथील जीवन पूर्वपदावर येण्यासाठी सहकार्य करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news