Whale vomit smuggling | व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचे कोल्हापूर कनेक्शन

स्थानिक टोळ्यांच्या शिरकाव; कोट्यवधीची उलाढाल
Whale vomit smuggling
पुणे-बंगळूर महामार्गावर व्हेल माशाची तस्करी करणार्‍या टोळीला जेरबंद करून 5 कोटी 24 लाखाची उलटी हस्तगत करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई केली. (छाया : अर्जुन टाकळकर)
Published on
Updated on

दिलीप भिसे

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणीसह सर्वाधिक किंमत आणि हिर्‍यापेक्षाही मौल्यवान असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा तस्करी सुरू झाली आहे. जिल्ह्यासह कर्नाटकातील तस्करांना जेरबंद करून पथकाने महामार्गावर कणेरीवाडीजवळ शनिवारी ( दि. 27) साडेपाच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य तस्करांनी स्थानिक टोळ्यांना हाताशी धरून व्हेल माशाच्या उलाढालीचा पुन्हा बाजार मांडला जाऊ लागला आहे. कोट्यवधीची उलाढाल करणार्‍या रॅकेटमध्ये कोकणसह पश्चिम महाराष्ट्राचे कनेक्शन समोर येत आहे.

कोकणातील खोलवर समुद्रात म्हाकुळची प्रचंड प्रमाणात पैदास होऊ लागली आहे. म्हाकूळ खाण्यासाठी व्हेल मासे कोकण किनारपट्टीकडे वळत आहेत. साधारणत: व्हेल मासे दीड ते दोन टन वजनाचे असतात. ते एकाचवेळी शंभर ते दीडशे म्हाकूळ खाऊ शकतात. म्हाकूळच्या कवचधारी भागाचे पचन होत नाही. ते व्हेल माशाच्या पोटात साठते. हा भाग उलटीच्या रूपाने बाहेर पडतो. समुद्रातील पाण्यावर उलटी तरंगते. त्याचा लगदा होऊन दीड-दोन वर्षांनंतर हा लगदा कनार्‍यावर येतो. त्यास व्हेल माशाची उलटी म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिकिलो सव्वा ते दीड कोटीचा भाव असलेल्या व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक टोळ्या सक्रिय आहेत.

8 तस्करी टोळ्यांना बेड्या

तीन वर्षांत कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात आठ ते दहा टोळ्यांतील सराईतांना अशा गुन्ह्यांत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये कोल्हापूर पोलिसांनी एका बड्या तस्कराला बेड्या ठोकून टोळीचा पर्दाफाश केला होता. या टोळीकडून 5 कोटी 46 लाख85 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.

व्हेल माशाची उलटीची तस्करी आंतरराष्ट्रीय टोळ्यांची चढाओढ

भारतात इतर किनारपट्टीप्रमाणे कोकण किनारपट्टीवर काही काळापासून व्हेल माशा आढळून येत आहे.व्हेल माशामध्ये दात असलेले आणि दात नसलेल्या दोन प्रजाती आहेत. उलटी उपयुक्त असलेला स्पर्मव्हेल हा दात असलेल्या प्रजातीतला आहे.व्हेल मासा समुद्र किनार्‍यापासून खूप दूर अंतरावर असतो. उलटीसारखा भाग किनार पट्टीवर येण्यासाठी वर्ष, दिड वर्षाचा कालावधी लागतो. व्हेल प्रजातीचे अनेक मासे समुद्रात आढळतात.मात्र, स्पर्मव्हेल प्रजातीच्या व्हेल माशाच्या उलटीलाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधीचा भाव मिळतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तस्करांची व्हेल माशाच्या उलटीसाठी चढाओढ असते.

जागतिक बाजारपेठेत सुंगधित उत्पादनाद्वारे कोट्यवधीची उलाढाल

व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अ‍ॅम्बरग्रीस (उलटी) हे उंची अत्तर, सुंगधित उत्पादनामध्ये वापर करतात. जगभरात उंची अत्तराची कोट्यवधीने उलाढाल होत असते. अगरबत्ती, धूप, तसेच स्थिरीकरण द्रव्य (फिक्सेटिव्ह) म्हणूनही कपड्यावर, शरीरावर मारल्यास बराच काळ सुंगध टिकून राहतो. उलटी नैसर्गिक असल्याने सेंटबरोबर त्याचा औषधासाठीही वापर केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news