

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : साडेतीनशे वर्षांपूर्वी पडलेला पराक्रमी इतिहास अनुभवण्यासाठी देशभरातून हजारो युवावर्ग पन्हाळगड- पावनखिंड चारीत भर पावसात सहभागी होत असतात. या शिवभक्तांची ठिकठिकाणी राहण्याच्या सुसज व्यवस्थेसह पूर्णपणे आराखडा तातडीने मार्गी लावला जाईल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. पन्हाळगड-पावनखिंड विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्राच्या बतीने आयोजित पन्हाळगड-पावनखिंड मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे होते. दरम्यान, मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर झाली. यावेळी नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचे व वीर शिवा काशीद यांच्या समाधीचे पूजन झाले.
खा. शिंदे म्हणाले, पावनखिंडचा रणसंग्राम हा एक इतिहासातील महत्त्वाचा अध्याय आहे. बीर शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, कृष्णाजी बांदल, विठोजी काटे, शंभूसिंग जाधव यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. त्यांचा अजरामर इतिहास तरुणांपर्यंत नेण्याचे काम शिवाष्ट्र परिवार करत आहेत.
खा. धैर्यशील माने म्हणाले, पन्हाळगड-पावनखिंड ऐतिहासिक मार्गावर शिवभक्तांसाठी जे काही लागेल ते देण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत. तरुणांना देणाऱ्या या मोहिमेत मुक्कामाची सुरज व्यवस्था होईल, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, शिवराष्ट्र परिवाराने गेल्या ३० वर्षांपासून इतिहास जगभर पोहोचवला आहे. तरुणांनी अशा मोहिमांत सहभाग घेऊन भविष्य घडवावे. मुख्यमंत्री वैद्यकीय प्रमुख मंगेश चिवटे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवराष्ट्र परिवाराचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी इतिहासासह पावनखिंड मोहिममागचा उद्देश विशद केला.
या मोहिमेत वीर रापाजी बांदल यांचे वंशज अनिकेत बांदल, सेनापती कान्होजी जेधे यांचे इंद्रजीत जेथे. बाळासाहेब सनस, करण पाटील, मोहीमप्रमुख गणेश कदम, विनायक जरांडे, मोहन खोत, राजेंद्र पवार, विराज साळुंखे, अभिजीत चव्हाण, ऋतुराज चौगुले, शुभम चौगुले, रमेश जाधव, विजय खोत, गजानन परीट, विक्रांत भागोजी, उमेद रजपूत, अभिजीत पवार, अतुल कापटे यांच्यासह देशभरातून (७०० हून अधिक मोहीममीवर सहभागी झाले आहेत.