कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीतच

पाणीपुरवठा पूर्ववत व्हायला आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता
Water supply of Kolhapur city is disturbed
कोल्हापूर : बालिंगा उपसा केंद्रात 300 एचपीचा विद्युत पंप बसवून पाणीपुरवठा सुरळीत केला.Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : महापुरामुळे विस्कळीत झालेल्या शहरातील पाणीपुरवठ्याची घडी अद्याप बसलेली नाही. रविवारी रात्री पुन्हा थेट पाईपलाईनला वीजपुरवठा करणार्‍या वीज वाहिनीवर झाडाची फांदी पडली होती. त्यामुळे तासभर पाणीपुरवठा बंद झाला होता. तत्काळ ही बाब लक्षात येताच फांदी हटवून वीजवाहिनी जोडून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. बालिंगा उपसा केंद्रातील दोन पंप सुरू झाले आहेत. त्यामुळे येथूनही पाणीपुरवठा काही प्रमाणात सुरू झाला आहे. विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पूर्ववत व्हायला आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.

Summary
  • घडी बसायला आणखी दोन दिवस

  • थेट पाईपलाईनचा वीज प्रवाह वारंवार खंडित

  • बालिंगा उपसा योजनेत नवीन विद्युत पंपाची जोडणी

Water supply of Kolhapur city is disturbed
कोल्हापूर : महापुरामुळे नृसिंहवाडीत व्यापारी पेठ ठप्प

कोल्हापूर शहरात सोमवारीदेखील काही भागामध्ये कमी दाबाने, तर काही भागात अपुरा पाणीपुरवठा झाला. नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. थेट पाईपलाईन योजनेतून 940 एचपीच्या 3 पंपांतून उपसा सुरू आहे, तर बालिंग्यातून 300 एचपी आणि 200 एचपीच्या पंपांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सोमवारी सी आणि डी वॉर्ड तसेच ए वॉर्डातील अनेक भागांत पाणी आले नव्हते. रविवारी पाण्याच्या खजिन्याजवळ व्हॉल्व्हमध्ये झापडी पडल्याने पाणीपुरवठा झाला नव्हता. माजी नगरसेवक अजित राऊत यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली होती; परंतु रविवारी शिवाजी पेठ परिसराला पाणीपुरवठा झाला नाही.

Water supply of Kolhapur city is disturbed
Kolhapur Flood Update | नृसिंहवाडीत पूर परिस्थिती; व्यापारी वर्गात साहित्य हलविण्याची लगबग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news