Kolhapur Flood : शिरटी - शिरोळ मार्गावर पाणी; रात्रीपर्यंत वाहतूक बंद होण्याची शक्यता

पाणी वाढल्यास महावीरनगर मार्गे कनवाड-शिरोळ रस्त्याने वाहतूक सुरू होईल
Water on the Shirti-Shirol route; Traffic may be blocked till night
शिरटी - शिरोळ मार्गावर पाणी; रात्रीपर्यंत वाहतूक बंद होण्याची शक्यताpudhari Photo
Published on
Updated on

शिरटी : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तरीही राधानगरी व कोयना धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे. आज (रविवार) सकाळी शिरटी-शिरोळ मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. (Kolhapur Flood)

Water on the Shirti-Shirol route; Traffic may be blocked till night
Kolhapur Flood | महापूर समस्या सोडविण्यासाठी लोकशक्ती हवी !

सध्या या पाण्यातूनच वाहतूक सुरू आहे. हे पाणी आणखी वाढल्यास महावीरनगर मार्गे कनवाड-शिरोळ रस्त्याने वाहतूक सुरू होईल. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नागरिकांनी धीर धरला असला तरी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नागरिकांच्या मनामध्ये महापुराची धास्ती कायम आहे. (Kolhapur Flood)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news