Yadrav Murder Case | यड्राव येथे हॉटेलमध्ये वेटरचा खून

हल्लेखोरांचे पलायन; सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू
Yadrav Murder Case |
Yadrav Murder Case | यड्राव येथे हॉटेलमध्ये वेटरचा खून
Published on
Updated on

यड्राव : येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या हॉटेल अ‍ॅॅकॉर्डमध्ये वेटरचा खून केला. अल्बर्ट हेरीबेन्नी अंब्रोस (वय ४८, रा. गावठाण, यड्राव) असे तरुणाचे नाव आहे. गंभीर अवस्थेत त्याला कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. घटनेनंतर हल्लेखोराने पलायन केले आहे.

हॉटेलमध्ये झालेल्या वादातून संशयितांनी अल्बर्ट याच्या डोक्यावर जड पाईपसदृश वस्तूने हल्ला केला. तो गंभीर जखमी होऊन खाली पडल्यानंतर हल्लेखोराने दगडाने त्याच्यावर पुन्हा हल्ला केल्याचे सांगण्यात येते. यावेळी इतर वेटर मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. शहापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार, उपनिरीक्षक महावीर कुटे, श्रीकृष्ण दरेकर यासह पोलिस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींची माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. हल्लेखोरांपैकी काहीजण सराईत गुन्हेगार आहेत का, याचाही पोलिस तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news