

कोल्हापूर : जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात 2024 साली मुदत संपलेल्या 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झालेल्या नाहीत. 2025 यावर्षी मुदत संपणार्या दोन व हातकणंगले तालुक्यातील सोनार्ली या नव्याने स्थापन झालेल्या अशा एकूण 25 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या 19 मार्च रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या प्रारूप मतदार यादीवर दि. 24 मार्चपर्यंत हरकत घेता येणार आहे. यानंतर दि. 26 रोजी या मतदार याद्या अंतिम केल्या जाणार आहेत. 2025-26 मध्ये मुदत संपणार्या 2 व नवीन एक अशा तीन ग्रामपंचायतींसाठी प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम सुरू असून बुधवारी प्रारूप प्रभाग आरक्षण प्रसिद्ध करण्यात आले. त्यावर दि. 19 मार्चपर्यंत हरकत घेता येणार आहे. दाखल हरकतीवर दि. 21 पर्यंत प्रांताधिकारी आपले अभिप्राय देणार असून, दि. 24 रोजी जिल्हाधिकारी प्रभाग रचला अंतिम मान्यता देणार आहेत.