कोल्हापूर: ‘राजाराम’ कारखान्याची बुधवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

राजाराम सहकारी साखर कारखाना
राजाराम सहकारी साखर कारखाना
Published on
Updated on

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२८ या पंचवार्षिक निवडणूकीसाठी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर कार्यालयाकडून १३, ५३८ पात्र मतदारांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. यापैकी १३, ४०९ ऊस उत्पादक तर १२९ ब वर्ग सभासद पात्र ठरले आहेत. ८ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) गाडे यांनी दिली आहे.

कारखान्याने सादर केलेल्या १६८१५ ऊस उत्पादक व १४३ ब वर्ग (संस्था सभासद) यादीवर हरकतीनंतर गत बुधवारी सुनावणी झाली होती. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी मोठा युक्तिवाद केला होता. यानंतर दोन्ही गटाकडून दाखल करण्यात आलेल्या समर्थनार्थ कागदाच्या छाननीअंती, आय आणि जे अभिलेखामधील तरतुदीनुसार यादीतील नोंद २६४९ (मयत) ऊस उत्पादक सभासद तसेच ६५४ (विरोधी गट) व १०३ (सताधारी गट) यांच्या हरकती ने ७५७ (मयत) असे एकूण ३४०६ ऊस उत्पादक सभासद यादीतून कमी करण्यात येणार आहेत. ब वर्ग (संस्था गट) सभासदांचे एकूण १३२ ठराव दाखल झाले. यामधील हरकतीवरील सुनावणीनंतर ३ सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. ब वर्ग संस्था गटातील १२९ सभासद पात्र ठरणार आहेत.

गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नावे हातकणंगले तालुक्यातील एका संस्थेमधून ठराव होता. त्या या संस्थेच्या सभासदच नाहीत, अशी तक्रार विरोधी गटाने केली होती, सदरच्या संस्थेने त्या आपल्या संस्थेच्या सभासद आहेत, असा दाखला दिल्यामुळे विरोधकांचा हा अर्ज निकाली काढण्यात आला. कारखान्याच्या प्रारूप मतदार यादीवर एकूण १९ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी सर्व कागदपत्रांची छाननी करून निकाल दिला. दोन्ही गटाकडील समर्थकांना जर निकाल मान्य नसेल. तर न्यायालयात जाण्याचा मार्ग खुला आहे. दरम्यान बुधवारी (दि. ८) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news